पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब

| Updated on: Oct 29, 2019 | 4:32 PM

राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घताले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब
Follow us on

अकोला : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घातले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात परतीच्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान (Farmers lost crop due to rain) झाले. तर कोकणात भात शेतींसह नाचणी आणि वरी कुजून गेली. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला आहे.

शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन आणि कापूस पिकवला होता. पण पावसामुळे या पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीनच्या पिकाला जागेवर परतीच्या पावसामुळे कोंब फुटले आहे. तर कोकणातील नाचणीच्या पिकांना पुन्हा अंकुर फुटले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यवतमाळमध्येही कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. परतीचा पाऊस गेले 10 ते 15 दिवस सलग कोसळत असल्याने पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

राज्यातील शेतकरी हा नेहमीच संकटात सापडतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधीओला दुष्काळ, पण यावेळी शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात शेतकरी कपाशी काढण्याच्या व सोयाबीन सोंगण्याच्या तयारीत असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्याची धांदल उडाली. परतीचा पाऊस एक दिवस नव्हे तर चक्क 15 दिवसांची हजेरी लावल्याने उभ्या सोयाबीनला कोंब फुटले.

दरम्यान, शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे सरकार काही मदत करेल का या प्रतीक्षेत शेतकरी बसला आहे. परतीच्या पावसांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे.