
आरामदायी जीवनशैली आणि बदललेला आहारामुळे गॅस, एसिडीटी आणि बद्धकोष्ठता या समस्या सर्वसाधारण झाल्या आहेत. काही जण रात्रीचा आहार खूप घेतात,त्यामुळे गॅस जास्त होतो. आणि ब्लोटिंगसारख्या समस्या निर्माण होतात. या पासून काही जण औषधे देखील घेतात. परंतू त्यांची सवय लागू शकते. त्यामुळे हे काही नैसर्गिक उपाय आजमावून पाहा…
पोटात गॅस झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा अन्नामुळे गॅस तयार होतो. तर काही वेळा या गंभीर कारणे देखील जबाबदार असते. आपण जे खातो त्यातील काही हिस्सा सहज पचतो, परंतू कार्बोहायड्रेट, साखर, फायबर आणि काही स्टार्च लवकर पचत नाहीत. जेव्हा हे पदार्थ मोठ्या आतड्यात पोहचतात. तेव्हा तेथील चांगले-वाईट बॅक्टेरिया त्याचे विघटन करतात. त्यामुळे गॅस तयार होतो. गॅस केवळ चुकीचा आहाराने नव्हे तर पचन यंत्रणेवरही अवलंबून असते. काही जण याकडे लक्ष देत नाहीत. परंतू वारंवार गॅस झाल्याने अनेक आजार झाले असते. त्यामुळे त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला गॅसेसचा प्रचंड त्रास होत असेल तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायला सुरुवात करावी. हे तुमचे पोट हलके करण्यास मदत करेल. गरम पाण्यात लिंबू टाकूनही पिऊ शकता. हे तुमच्या शरीरातून जास्त असलेले सोडियम बाहेर काढते आणि ब्लोटिंगला कमी करण्यास मदत करते.
रात्री हलके पदार्थ खायला हवेत जड जेवण केले तर गॅस आणि ब्लोटिंग समस्येला आमंत्रण मिळण्याची शक्यता अधिक असते. डीनरला सहज पचणारे पदार्थ खावेत.त्यामुळे पोटाला हलके वाटले. गॅस देखील होणार नाही.
पेपरमिंट ( पुदीना ) , आले आणि मेथी दाणे या सारख्या पदार्थांनी ब्लोटिंगपासून आराम मिळतो. याचा चहा बनवून प्यायल्याने गॅसेस पासून सुटका मिळते.हे पदार्थ पचनसंस्थेतील स्नायूंचे आकुंचन कमी करतात. त्यामुळे गॅस सहज निघून जातो आणि पोट हलके होते.
Gentle Abdominal मसाज देखील ब्लोटिंग आणि गॅस सारख्या समस्येला दूर करण्यासाठी मदत करतो. यासाठी पोटावर हलक्या हाताने सर्क्युलेशन मोशन मसाज करावा. त्यानंतर बेंबीच्या चारी बाजूंनी मसाज करावा, यामुळे गॅस सहज निघतो आणि पोटात हलके-हलके वाटते.