AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराडमध्ये मध्यरात्री गोळीबार, 24 वर्षीय तरुणावर घरात घुसून 6 ते 7 गोळ्या झाडल्या

कराडमध्ये (Karad Firing) मध्यरात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल 7 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कराडमध्ये मध्यरात्री गोळीबार, 24 वर्षीय तरुणावर घरात घुसून 6 ते 7 गोळ्या झाडल्या
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 21, 2019 | 12:04 PM
Share

सातारा : कराडमध्ये (Karad Firing) मध्यरात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल 7 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

पवन दीपक सोळवडे (वय 24, रा. बुधवार पेठ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या घराच घसून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. फिल्मी स्टाईलने झालेल्या गोळीबारात पवनवर सहा ते सात गोळ्या फायर करण्यात आल्या.

मध्यरात्री झालेल्या या थरारामुळे बुधवार पेठ आणि मंडई परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला पांगवावे लागले. या गोळाबारीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंडगिरीच्या वर्चस्वाच्या वदातून हा प्रकार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.

याप्रकरणी  शिवराज इंगवले, समीर मुजावर आणि जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांचा संशय आहे. त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. या गोळीबाराचं वृत्त कळताच संपूर्ण कराड शहरात मोठ तणाव निर्माण झाला. बुधवार पेठ परिसरात काही ठिकाणी गाड्या जाळणे, दगडफेकीचे प्रकारही झाले.

गुंडगिरीच्या वर्चस्व वादातून गोळीबार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, या गोळीबारानंतर आज सकाळी  कराड पोलिस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला. पवन सोळवंडे समर्थकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. आरोपींना खुनासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप सोळवंडे समर्थकांनी केला.

Follow Us
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड