बीडमध्ये नदीत आला माशांचा महापूर; मासे पकडण्यासाठी लोकांची गर्दी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला आहे. नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाहून आलेले मासे पाहण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी केली. केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील गावालगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुलाजवळच्या नदी पात्रात पाण्यासोबत जिवंत मासे वाहत असल्‍याचे दिसून आले.

बीडमध्ये नदीत आला माशांचा महापूर; मासे पकडण्यासाठी लोकांची गर्दी
| Updated on: Jul 16, 2022 | 9:51 PM

बीड : राज्यात सर्वत्र पावसाने धुशान घातले असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आला आहे. बीडमध्ये(Beed) मात्र, एका नदीत माशांचा(Fish) महापूर आहे. नदीत मोठ्या प्रमाणात मासे वाहून आले. नदीत मोठ्या प्रणामात मासे आल्याचे वृत्त जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. यानंतर नागरीकांनी नदी किनारी एकच गर्दी केली. अनेकांनी हे मासे पकडून घरी नेले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला आहे. नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाहून आलेले मासे पाहण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी लोकांची गर्दी केली. केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील गावालगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुलाजवळच्या नदी पात्रात पाण्यासोबत जिवंत मासे वाहत असल्‍याचे दिसून आले.

या नदीच्या पाण्यात जणू माशांचा महापूर आल्यासारखे चित्र निर्माण झाले. हा प्रकार पाहिल्‍यानंतर खवय्यांनी मासे पकडण्यासाठी पुलावर एकच गर्दी केली. अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आल्‍याने लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली. लोकांनी जमतील तितके जास्तीत जास्त मासे पकडून घरी नेले. काहींनी नदीला आलेल्‍या माशांच्या पुराचे हे दृष्‍य आपल्‍या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. मांजरा धरण जवळच असल्याने बॅकवॉटरमधून हे मासे आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

 

Follow us
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.