AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात फुलांचे दर वाढणार, पावसाच्या सावटामुळे उत्पादक चिंतेत

नवरात्रोत्सवात फुलांचे दर वधारणार आहेत. काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असताना फुलांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झालाय. Flower rates jalgaon

जळगावात फुलांचे दर वाढणार, पावसाच्या सावटामुळे उत्पादक चिंतेत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 16, 2020 | 6:51 PM
Share

जळगाव – जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. ऐन नवरात्रोत्सवात फुलांचे दर वधारणार आहेत. काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असताना फुलांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झालाय. फुलांच्या भावात दरवाढ झाली असली तरी उत्पादक मुसळधार पावसामुळे चिंतेत आहेत. (Flower rates increased in market of Jalgaon)

नवरात्रोत्सवात फुलांना अधिक मागणी असते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस व विजयादशमीला असे दहा दिवस झेंडूला मागणी असते. झेंडूचे उत्पादक शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये झेंडूचे उत्पादन येईल, या पद्धतीने शेती केली आहे. सध्या झेंडूला असलेली मागणी पाहता शंभर रुपये प्रतिकिलो दर नवरात्रोत्सवात मिळेल, अशी अपेक्षा फूल उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

झेंडूच्या फुलांच्या माळा करून नवरात्रोत्सवात देवीला चढवल्या जातात. यामुळे झेंडूला या दिवसांत अधिक मागणी असते. नवरात्रोत्सव, दिवाळीचे दिवस फुलांच्या मागणीचे असतात. शिरसोली (ता. जळगाव) येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना मागणी असते. काही व्यापारी येथून फुले घेऊन परजिल्ह्यात फुले विकतात.

जळगाव शहरात शिरसोली येथील फूल उत्पादक दररोज आठ ते दहा टन फुलांचा पुरवठा करतात. उत्सवाच्या काळात फुलांना अधिक मागणी असल्याने पुरवठाही दुप्पट होतो. मात्र, कोरोनामुळे यंदा फूल उत्पादकांनी फूल शेतीकडे कमी लक्ष दिले आहे. फुले तोडण्यासाठी लागणारे मजूर कोरोना संसर्गामुळे येतील किंवा नाही याची शंका त्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीचे प्रमाण कमी केले आहे.

झेंडू आणि इतर फुले नवरात्रोत्सव व दिवाळीत बाजारात जातील या दृष्टीने फूल शेती उत्पादकांचे नियोजन असले तरी येणारे संभाव्य वादळ, पावसावर ते अवलंबून आहे. अतिवृष्टी, वादळाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने फूल उत्पादक चिंतेत आहेत. चार-पाच दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. यात अतिवृष्टी झाल्याने फुलांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे बाजारपेठेत फुलांची आवक कमी होईल. परिणामी फुलांचा दर वधारेल, असे चित्र आहे.

जळगावात फुलांचे दर असे

फुले          आजचा भाव
झेंडू                60 रु प्रति किलो
गुलाब             200 रु
मोगरा              100 रु
पिवळा झेंडू         70 रु

संबंधित बातम्या : 

Satara | सातारा | कास पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण

Mumbai Ganeshostav 2020 | मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी

(Flower rates increased in market of Jalgaon)

Follow Us
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी