विलक्षण आवाजाचा लोककलावंत हरपला, ‘खंडेरायाच्या लग्नाला’ फेम छगन चौगुले यांचे निधन

| Updated on: May 21, 2020 | 2:56 PM

छगन चौगुले यांनी गायलेली कुलदैवतांची भक्तिगीते आणि लोकगीते विशेष गाजली. (Folk Artist Chhagan Chougule dies)

विलक्षण आवाजाचा लोककलावंत हरपला, खंडेरायाच्या लग्नाला फेम छगन चौगुले यांचे निधन
Follow us on

मुंबई : ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या खड्या आवाजातील गाण्याने घराघरात पोहोचलेले नामवंत लोककलाकार छगन चौगुले यांचे निधन झाले. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. (Folk Artist Chhagan Chougule dies)

कथा देवतारी बाळूमामा’, ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’ असे छगन चौगुले यांच्या आवाजातील एकापेक्षा एक अल्बम आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या गाण्याने चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचं हे गाणं हमखास सादर होतं. 2018 मध्ये त्यांना ‘लावणी गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हेही वाचा : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

छगन चौगुले यांनी गायलेली कुलदैवतांची भक्तिगीते आणि लोकगीते विशेष गाजली. जागरण गोंधळी असलेले छगन चौगुले अंगभूत गुणांमुळे लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. कला सादर करण्याची त्यांची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. (Folk Artist Chhagan Chougule dies)