Pranab Mukherjee | राज्यसभा सदस्य ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींची संपूर्ण राजकीय कारकीर्द

| Updated on: Aug 31, 2020 | 6:59 PM

भारत सरकारने 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

Pranab Mukherjee | राज्यसभा सदस्य ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींची संपूर्ण राजकीय कारकीर्द
Follow us on

नवी दिल्ली : भारताचे 13 वे राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज (31 ऑगस्ट) निधन झाले (Pranab Mukherjee Political Carrier). वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली (Pranab Mukherjee Political Carrier).

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. त्यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. 1969 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. भारत सरकारने 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यामधील किरनाहर तालुक्यातील निकट मिटरी गावात झाला. एका ब्राह्मण परिवारात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदा किंकर मुखर्जी आहे. प्रणव मुखर्जींनी वीरभूमीच्या सुरी विद्यासागर कॉलेजमधून शिक्षण घेतले. कोलकत्ता विद्यापीठातून त्यांनी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्समधून पदवी मिळवली.

प्रणव मुखर्जींनी वयाच्या 22 व्या वर्षी 13 जुलै 1957 रोजी शुभ्रा मुखर्जी यांच्याशी लग्न केले. त्यांना अभिजीत, इंद्रजीत अशी दोन मुलं आणि शर्मिष्ठा नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचे 18 ऑगस्ट 2015 ला निधन झाले (Pranab Mukherjee Political Carrier).

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द

  • प्रणव मुखर्जी यांनी 1969 मध्ये काँग्रेसमधून राज्यसभा सदस्य म्हणून राजकीय करियरची सुरुवात केली.
  • 1973 मध्ये औद्यागिक विकास विभागात केंद्रीय उपमंत्री म्हणून नियुक्ती केली.
  • 1997 मध्ये सर्वश्रेष्ठ खासदार म्हणून त्यांची निवड झाली.
  • मुखर्जी यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या जंगीपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.
  • इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये 15 जानेवारी 1982 ते 31 डिसेंबर 1984 पर्यंत ते वित्तमंत्री म्हणून कार्यरत होते.
  • पी. व्ही. नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये 10 फेब्रुवारी 1995 ते 16 मे 1996 पर्यंत प्रणव मुखर्जी हे भारताचे परराष्ट्र मंत्री होते.
  • मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात 22 मे 2004 ते 26 ऑक्टोबर 2006 पर्यंत ते भारताचे संरक्षण मंत्री होते.
  • मनमोहन सिंग सरकारच्या काळातच त्यांनी 24 जानेवारी ते 26 जून 2012 पर्यंत ते केंद्रीय मंत्रिमंडळात वित्तमंत्री म्हणून कार्यरत होते.
  • प्रणव मुखर्जी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 रोजी त्यांनी भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. हे पहिले बंगाली राष्ट्रपती बनले.
  • 2007 मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
  • 2010 मध्ये ‘फायनान्स मिनीस्टर ऑफ द इअर फॉर एशिया’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

Pranab Mukherjee Political Carrier

संबंधित बातम्या :

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन