सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा, पीओके मिळवण्यासाठी कधीही सज्ज : लष्कर प्रमुख

| Updated on: Sep 12, 2019 | 5:40 PM

देशातील संस्था (Army Chief General Bipin Rawat) सरकारच्या निर्णयानुसार काम करतात. त्यामुळे भारतीय सैन्य कधीही कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं सांगत लष्कर प्रमुख बिपीन रावत (Army Chief General Bipin Rawat) यांनी पीओके मिळवण्यासाठी सैन्य कधीही सज्ज असल्याचं सांगितलं.

सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा, पीओके मिळवण्यासाठी कधीही सज्ज : लष्कर प्रमुख
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर मोदी सरकारचा जोर आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग (पीओके – पाकव्याप्त काश्मीर) परत मिळवण्यावर आहे. या बाबतीत सरकारला निर्णय घ्यावा लागतो, देशातील संस्था (Army Chief General Bipin Rawat) सरकारच्या निर्णयानुसार काम करतात. त्यामुळे भारतीय सैन्य कधीही कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं सांगत लष्कर प्रमुख बिपीन रावत (Army Chief General Bipin Rawat) यांनी पीओके मिळवण्यासाठी सैन्य कधीही सज्ज असल्याचं सांगितलं.

दरम्यान, नुकतंच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही मोठं वक्तव्य केलं होतं. सरकारचा पुढील अजेंडा पीओके मिळवणं असल्याचं ते म्हणाले होते. मोदी सरकारच्या 100 दिवसातील कार्यकाळाबाबत बोलताना पीओके मिळवणं हे सरकारचं पुढील काम असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले होते. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके म्हणतात.

पीओके मिळवणं ही फक्त भाजपचीच भूमिका नाही, तर 1994 मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारनेही संकल्प मंजूर केला होता. त्यामुळे पीओके परत मिळवणं ही सर्वांचीच भूमिका असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले.

जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करणाऱ्या कलम 370 मधील महत्त्वाच्या तरतुदी सरकारने रद्द केल्या. त्यानंतर काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलंय. त्यातच आता सरकारचंही पुढचं लक्ष्य पीओके आहे. त्यामुळे लष्कर प्रमुखांनीही कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं सांगून पीओकेवर पुन्हा एकदा दावा केलाय.

राजनाथ सिंहांचाही इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही यापूर्वी पाकिस्तान सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. पाकिस्तानकडून सतत कुरापती केल्या जात आहेत. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता चर्चा ही काश्मीरवर नाही, तर पीओकेवरच होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले होते.