‘पुरोगामी’च हवा, 180 स्थळं नाकारल्यानंतर अखेर हवा तसा जोडीदार सापडला!

बीड : जोडीदार चांगला मिळावा ही प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. अवघं आयुष्य ज्याच्यासोबत काढायचंय, तो निर्व्यसनी असावा, कर्तबगार असावा, शिवाय पुरोगामी विचारांचा असावा, अशी अट घालत बीडमधील एका उच्चशिक्षित मुलीने आणि तिच्या कुटुंबाने तब्बल 180 स्थळ नाकारली. अखेर एक उच्चशिक्षित मुलगा मुलीच्या अटीप्रमाणे  मिळाला आणि आज त्यांचा मंगल परिणय अत्यंत साध्या आणि पुरोगामी पद्धतीत पार […]

'पुरोगामी'च हवा, 180 स्थळं नाकारल्यानंतर अखेर हवा तसा जोडीदार सापडला!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:32 PM

बीड : जोडीदार चांगला मिळावा ही प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. अवघं आयुष्य ज्याच्यासोबत काढायचंय, तो निर्व्यसनी असावा, कर्तबगार असावा, शिवाय पुरोगामी विचारांचा असावा, अशी अट घालत बीडमधील एका उच्चशिक्षित मुलीने आणि तिच्या कुटुंबाने तब्बल 180 स्थळ नाकारली. अखेर एक उच्चशिक्षित मुलगा मुलीच्या अटीप्रमाणे  मिळाला आणि आज त्यांचा मंगल परिणय अत्यंत साध्या आणि पुरोगामी पद्धतीत पार पडला.

हातामध्ये भारतीय संविधान घेऊन उभे असलेले हे लोक पाहून तुम्हाला एखादा कार्यक्रम असल्याचं वाटत असावा. मात्र हा कार्यक्रम नाही, तर हा एक मंगल परिणय आहे. एरवी एखाद्या विवाह प्रसंगात गेल्यानंतर नव वधू-वरांना भेटवस्तू देण्याची आपली तशी जुनीच परंपरा आहे. मात्र येथे ही परंपरा मोडीत काढली आहे. इथे मात्र वधू-वरांकडील येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना गिफ्ट करण्यात आले. हे गिफ्ट दुसरं-तिसरं नाही तर भारतीय संविधान देण्यात आले.

सध्याचा भीषण दुष्काळ आणि यास दुष्काळात विवाह प्रसंगातला आर्थिक भार कोणालाही पडू नये यासाठी हा अनोखा विवाह संकल्प करण्यात आला होता. लग्नात सनईचौघडा होता, मंडप सजलेलं होतं, मंडपात वऱ्हाडी मंडळी बसलेली होती, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या या वधूचे नाव आहे मनिषा शेंडगे.

मनिषा ही उच्चशिक्षित आहे आणि वर सतीश शिंदे हा देखील उच्चशिक्षित आहे. चांगला जोडीदार मिळावा, जोडीदार हा निर्व्यसनी रहावा, शिवाय पुरोगामी असावा, यासाठी मनिषा आणि तिच्या वडिलांनी तब्बल 180 स्थळं नाकारली. शेवटी सतीश पांडुरंग शिंदे हा उच्चशिक्षित तरुण तिला भेटला आणि शेवटी नवदाम्पत्य बोहल्यावर चढले. मनासारखा जोडीदार मिळाल्याने वधू मनिषा खूप आनंदी आहे.

या अनोख्या विवाहाला वऱ्हाडी मंडळींसोबत राज्यातील पुरोगामी साहित्यिकांनी हजेरी लावली होती. राज्यभरातून आलेल्या पाहुण्यांना या वधूवरांनी भारतीय संविधान देऊन त्यांच्या आगमनाचा सत्कार केला एखाद्या विवाह प्रसंगात सविधान देऊन सत्कार करणारे हे पहिलेच नवदांपत्य ठरले आहेत.

विवाह म्हटलं की लाखोंचा खर्च आणि तो डामडौल हे नित्याचेच असते, मात्र हा विवाह भीषण दुष्काळात कसलाच अपव्यय खर्च न करता एक आदर्श ठरला आहे. त्यामुळे समाजाने असे विवाह सादर करुन एक नवीन पायंडा घालावा, असे आवाहन वऱ्हाडी मंडळी पाहुण्यांनी केले आहे.

एखाद्याचा विवाह म्हणजे आयुष्यातील एक पर्वणीच असते. त्यामुळे विवाहात देखणा, व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यासाठी लाखोंची उधळणही केली जाते. मात्र भीषण दुष्काळात कमी खर्चात समाजाला संदेश देणारा हा पुरोगामी विवाह बीडमध्ये पाहावयास मिळाला. या विवाहाचा इतरांनी आदर्श घेणे काळाची गरज आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें