Gold rate | जळगावात सोन्याचा भाव 53 हजाराच्या दिशेने

| Updated on: Jul 02, 2020 | 8:47 PM

जळगावात गुरुवारी (2 जुलै) सोन्याच्या भावाने 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे (Gold rate in jalgaon increasing fastly)..

Gold rate | जळगावात सोन्याचा भाव 53 हजाराच्या दिशेने
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us on

जळगाव : एकिकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. मात्र, जळगावात गुरुवारी (2 जुलै) सोन्याच्या भावाने 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे (Gold rate in jalgaon increasing fastly). गुरुवारी सकाळी सराफ बाजार उघडला तेव्हापासून सोन्याचे भाव (जीएसटीसह) 51 हजार 500 रुपये इतके आहेत. येत्या आठवडाभरात सोन्याचे भाव 53 हजार रुपये प्रतितोळा असतील, असा अंदाजही सराफ व्यावसायिकांनी वर्तवला आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचं बोललं जात आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरु असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते. लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरु झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

लग्नसराई देखील काही प्रमाणात सुरु झाल्याने सोने चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

चांदीच्या भावातही वाढच

एकिकडे सोन्याचे भाव सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील सातत्याने वाढत आहेत. गुरुवारी जळगावात चांदीचे भाव प्रतिकिलो 51 हजार 500 रुपये असे होते. सध्याच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे दर स्थिर असले, तरी भारत-चीन, चीन-अमेरिका यांच्यातील तणाव, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या साऱ्या गोष्टींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत, असं मत सराफ व्यावसायिक अजय ललवाणी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, ‘हे’ दहा बदल

Prakash Javadekar | नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी ठेवीदारांना केंद्राचा दिलासा

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवहारात वाढ, एप्रिल महिन्यात शंभर कोटींचा व्यवहार

Gold rate in jalgaon increasing fastly