Prakash Javadekar | नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी ठेवीदारांना केंद्राचा दिलासा

सहकारी बँका आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्याच्या निर्णयामुळे 8.6 कोटीहून अधिक ठेवीदारांना आपले 4.84 लाख कोटी रुपये सुरक्षित असल्याची हमी मिळेल, असं प्रकाश जावडेकर म्हणाले

Prakash Javadekar | नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी ठेवीदारांना केंद्राचा दिलासा

नवी दिल्ली : नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला आहे. मल्टिस्टेट बँकांवरही आरबीआयची देखरेख राहणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर जावडेकरांनी या संदर्भात घोषणा केली. (Urban cooperative and multi-state cooperative banks being brought under supervisory powers of  RBI)

“1482 नागरी सहकारी बँक आणि 58 बहुराज्य (मल्टिस्टेट) सहकारी बँकांसह सर्व शासकीय बँकांना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अधिकारात आणले जात आहे; अनुसूचित बँकांना लागू असलेले आरबीआयचे अधिकार सहकारी बँकांनाही लागू होतील” असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. लवकरच यासंदर्भात अध्यादेश जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

1,540 सहकारी बँका आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्याच्या निर्णयामुळे या बँकांमधील 8.6 कोटीहून अधिक ठेवीदारांना आपले 4.84 लाख कोटी रुपये सुरक्षित असल्याची हमी मिळेल, असे जावडेकर म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 टक्के व्याज सवलतीच्या प्रधान मंत्री मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्ज प्रवर्गातील 31 मार्च 2020 पर्यंत पात्र कर्जदारांना 12 महिन्यांच्या कालावधीसाठी थकबाकी देण्यास मान्यता दिली.

(Urban cooperative and multi-state cooperative banks being brought under supervisory powers of  RBI)

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI