‘चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले’, भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले

| Updated on: Nov 15, 2021 | 2:27 PM

2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका.

चांगले DYSP म्हणून तुम्हाला बारामतीत आणले, भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यावर उखडले
ajit pawar
Follow us on

पुणे – आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी तसेच कामाचा उरक असलेला राजकीय नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. कामात कूचराई करणाऱ्यांची ते गय करत नाहीत. पुढचा मागचा विचार न करता थेट कान उघडणी ते करतात. मास्क वापरासाठी रोहित पवारांच्या कानपिचक्या काढल्यानंतर आता बारामतीतील DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले आहे. बारामतीतील एका कार्यक्रमातील जाहीर सभेत त्यांनी ” तुम्ही चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले.” या शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

तर झालं अस की, बारामती तालुक्यातील कुठल्यातरी गावात अवैधरित्या दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अजित पवारांना निवेदन दिले. या निवेदनात संबधीत महिलेचा पती दारू पिऊन घरी त्रास देत असल्याची, मारहाण करत असल्याची माहिती देत आपली व्यथा मांडली होती. तसेच दारू बंदी करण्याची विनंतीही केली होती.

अडचण काय आहे?
अजित पवारांनी भर सभेत महिलेचे हेच निवेदन हातात धरत अधिकाऱ्याला खडसावले. ते म्हणाले ‘DYSP इथे दारूबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आले आहे. 2007 मध्ये दारूबंदी झाली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली. याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे. नेमकी अडचण काय आहे? कायमची दारू बंदी करून टाका. जे कोणी असतील त्यांना टाडा लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारूबंदी करून टाका. मी तुम्हाला चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले होते.

अवैध धंद्यावर कारवाई करा

बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारूविक्री, हातभट्टी कायमची बंद करा, जी कारवाई करायची असेल ती करा. असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भर सभेत दिलेल्या सूचना अधिकारीवर्गात चर्चा विषय ठरला.

हे ही वाचा 

दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’

शिवशाहीर पुरंदरे यांनीBabasaheb Purandare Death | शिवशाहीरांच्या निधनावर मोदींचं ट्विट, गडकरी, राऊत, इतर नेते नेमकं काय म्हणाले? 

छत्रपतींच्या इतिहासासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया