खुशखबर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणी साठा

| Updated on: Sep 27, 2019 | 12:28 PM

पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खुशखबर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणी साठा
Follow us on

मुंबई : पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake ) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाव परिसरात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वैतरणा, तानसासह इतर सर्व तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा (mumbai water supply lake) जमा झाला आहे.

सर्व तलावांमध्ये वार्षिक साठ्याच्या तुलनेत सुमारे 99 टक्के एवढा पाणीसाठा आहे. मुंबईकरांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची संक्रात (Mumbai Water cutting) यावर्षी टळली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी 3800 दशलक्ष अर्थात 380 कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. 26 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजेपर्यंत यासर्व तलावांमध्ये 14 लाख 30 हजार 224 दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

मुंबईकरांची वार्षिक तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असते. त्या तुलनेत यासर्व तलावांमध्ये 98.82 टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

दरम्यान, यंदा मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं आणि तलाव भरले आहेत. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव परिसरातही यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता मिठली आहे.

तलावांतील पाणीसाठा

  • अप्पर वैतरण : 2,23,190 दशलक्ष लिटर
  • मोडक सागर : 1,27,001 दशलक्ष लिटर
  • तानसा : 1,43,416 दशलक्ष लिटर
  • मध्य वैतरणा : 1,90,535 दशलक्ष लिटर
  • भातसा : 7,18,532 दशलक्ष लिटर
  • विहार : 27,698 दशलक्ष लिटर
  • तुळशी : 8,046 दशलक्ष लिटर

एकूण : 14,30,224 दशलक्ष लिटर