इम्रान सरकारच्या नव्या ‘इंटरनेट पॉलिसीवर’ तीव्र नाराजी, गूगल, फेसबुक, ट्विटरचा पाकिस्तान सोडण्याचा इशारा

गूगल, फेसबुक, ट्विटर या दिग्गज कंपन्यांनी नव्या इंटरनेट नियमांना विरोध करत पाकिस्तान सोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

इम्रान सरकारच्या नव्या ‘इंटरनेट पॉलिसीवर’ तीव्र नाराजी, गूगल, फेसबुक, ट्विटरचा पाकिस्तान सोडण्याचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 5:40 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) नवं इंटरनेट धोरण आणलं आहे. यात सोशल मीडिया कंपन्यांवर अनेक निर्बंध असून पाकिस्तान सरकारला या कंपन्यांवर सेन्सॉरशिपचे अनेक अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जगभरातील सोशल मीडिया कंपन्यांकडून या नियमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गूगल, फेसबुक, ट्विटर या दिग्गज कंपन्यांनी तर पाकिस्तान सोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने डिजीटल कंटेंटवर (Digital Content) सेन्सॉरशीप करण्यासाठी नव्य इंटरनेट नियमांना मंजूरी दिलीय. पाकिस्तानमध्ये देखील या नियमांना विरोध होत आहे. सरकारचे नवे नियम ही रुढीवादी इस्लामी राष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्यासाठी मंजूर केल्याचा आरोप होत आहे. आता दिग्गज इंटरनेट आणि टॅक्नोलॉजी कंपन्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान सोडण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आधीच आर्थिक डबघाईत आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.

इम्रान सरकारने बुधवारी इंटरनेटच्या नव्या नियमांना मंजूरी दिली आणि गुरुवारी आशिया इंटरनेट संघटनेने थेट पाकिस्तान सोडण्याचा इशारा दिला. आशिया इंटरनेट संघटनेत गूगल, फेसबुक आणि ट्विटरसह जगातील अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या या संघटनेचा भाग आहेत.

पाकिस्तानमध्ये नव्याने आलेल्या इंटरनेट नियमांनुसार, सोशल मीडियावर इस्लामचा अपमान, दहशतवादाला प्रोत्साहन, अश्लील भाषा, अश्लील साहित्य यासारखा आक्षेपार्ह कंटेंट शेअर केल्यास सोशल मीडिया कंपन्यांना किंवा इंटरनेट प्रोव्हायडर्सला 3.14 डॉलरपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी पाकिस्तानमध्ये व्हिडीओ शेअरिंग अॅप ‘टिकटॉक’ला ‘अनैतिक आणि असभ्य’ कंटेंट न हटवल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नव्या नियमांमध्ये नेमक्या काय तरतुदी?

नव्या नियमांनुसार पाकिस्तानच्या पीटीए विभागाला त्यांना वाटणारा चिथावणीखोर डिजिटल कंटेंट साईटवरुन हटवण्याचे आणि ब्लॉक करण्याचे अधिकार मिळाले आहेत. या अंतर्गत ‘पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षे’ला धोका तयार होईल असा कोणताही कंटेंट हटवता येणार आहे.

अशा प्रकरणांमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सोशल मीडिया कंपनी किंवा सर्विस प्रोव्हायडरला 3.14 मिलियन डॉलरपर्यंत दंडाची तरदूत करण्यात आलीय. ‘दहशतवाद, असभ्य भाषा, अश्लीलता, हिंसा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ निर्माण करेल असा डिजीटल कंटेंट अपलोडिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आक्षेपार्ह कंटेंट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 24 तासात आणि आपत्कालीन स्थिती 6 तासात हटवावा लागेल. नवे नियम टेलीकॉम अॅथॉरिटीला संपूर्ण ऑनलाईन सिस्टम ब्लॉक करण्याचे अधिकारही देते. पीटीएचे प्रवक्ते खुर्रम मेहरान यांनी सांगितलं की हे नियम परदेशी सोशल मीडिया कंपन्यांसोबत अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी तयार करण्यात आले.

पाकिस्तानमधील या नव्या नियमांनुसार देशात ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 5 लाख (अर्धा मिलियन) पेक्षा अधिक यूजर्स असतील त्यांना 9 महिन्यांच्या आत पीटीएसोबत नोंदणी करावी लागेल. तसेच 18 महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये एक कायमस्वरुपी कार्यालय आणि डेटाबेस सर्व्हर स्थापन करावं लागेल.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानमध्ये नवे इंटरनेट नियम, सरकारकडे सोशल मीडिया सेन्सॉरशीपचे निरंकुश अधिकार

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल

व्हिडीओ पाहा :

Google Facebook Twitter warn Imran government to leave Pakistan

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.