राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

| Updated on: Oct 15, 2019 | 8:02 PM

दिवाळीपूर्वी पगार (Government employees salary) देण्याचा निर्णयावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबर पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
Follow us on

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी पगार (Government employees salary) देण्याचा निर्णयावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबर पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच सरकारने याबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आहे.

बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 25 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने वित्त विभागाला आगावू पगार करता येणार नसल्याचं कारण देण्यात आलं होते. यामुळे अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार असल्याचे चित्र होते.

मात्र नुकतंच ही स्थगिती उठवत राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. यात महाराष्ट्र कोषागार नियम आणि मुंबई वित्तीय नियमांमधील काही नियम शिथिल करावेत. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आगावू पगार द्यावा असे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कडू झालेली दिवाळी गोड (Government employees salary) होणार आहे.

यामुळे पेन्शनधारकांसह सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात होणार असल्याचं चित्र होतं. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहिन्याच्या 1 तारखेला पगार दिला जातो. पण यंदा दिवाळी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 25 तारखेला असल्यामुळे लवकरच पगार दिला जाणार आहे.

दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी नको, शिवाय त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बोललं जात आहे.

संबंधित बातम्या : 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण, दिवाळीपूर्वी पगार नाही

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ