Brahmanal ground report | ब्रह्मनाळ गावात टीव्ही 9 मराठी, चहूबाजूंनी घेरलेल्या गावात पिण्याचं पाणीच नाही

Brahmanal ground report   | ब्रह्मनाळ गावात टीव्ही 9 मराठी, चहूबाजूंनी घेरलेल्या गावात पिण्याचं पाणीच नाही

ब्रम्हनाळ बोट (Brahmanal Boat Overturn) दुर्घटनेला आता 36 तास उलटत आहेत. मात्र नेमके किती लोक वाहून गेलेत याचाच नेमका आकडा माहीत नाही.

सचिन पाटील

|

Aug 09, 2019 | 2:59 PM

Brahmanal ground report सांगली : ब्रम्हनाळ बोट (Brahmanal Boat Overturn) दुर्घटनेला आता 36 तास उलटत आहेत. मात्र नेमके किती लोक वाहून गेलेत याचाच नेमका आकडा माहीत नाही. काल 9 मृतदेह हाती लागले, त्यानंतर आज 2 मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे, पण अधिकृत माहिती नाही. अद्याप 3 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. या बोटीत 30 लोक होते असं सांगण्यात येत होतं. मात्र त्याबाबतही अद्याप शंका आहे.

ज्या ठिकाणी कालची ब्रम्हनाळ बोट दुर्घटना घडली त्या घटनास्थळी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी राहुल झोरी पोहोचले. बोट दुर्घटनेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला आहे. शिवाय पायवाट असल्याने एका वेळी एकच माणूस पुढे जाऊ शकतो.

पुराने वेढलेल्या ब्रम्हनाळ गावातील लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटीतून बाहेर आणलं जात होतं. ब्रम्हनाळ गावात जाण्यासाठी अतिशय चिंचोळा रस्ता आहे. या रस्त्यानं दोन माणसांना देखील चालता येणार नाही, एवढी छोटी वाट आहे.

ब्रम्हनाळ दुर्घटनेनंतर प्रशासनाने गावकऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होतं. मात्र ब्रम्हनाळ गावात पोहोचलेल्या टीव्ही 9 च्या टीमला जे आढळलं ते चकीत करणारं होतं. अजूनही सरकारची कोणतीच मदत या गावात पोहोचलेली नाही.

सरकारनं केलेले सर्व दावे कसे उघडे पडलेत याचं जळजळीत वास्तव गावकऱ्यांनी मांडलं. गेल्या 4 दिवसांपासून हे लोक पाण्याने वेढली गेली आहेत. यांच्यापर्यंत इतर मदत तर सोडाच पण पिण्याचं पाणीही पोहोचलं नसल्याचं गावकरी सांगतात.

सध्या पुराच्या पाण्यातून पाण्यातून बाहेर पडण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

जनावरं छतावर

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानं शेकडो जनावर शेतकऱ्यांचा डोळ्यदेखत कागदाप्रमाने वाहून गेली. पोटच्या पोरासारखं सांभाळलेलं हे पशूधन जेव्हा डोळ्यादेखत वाहून जात होतं, तेव्हा शेतकरी तीळ तीळ तुटत होता.

जी जनावरं वाचली आहेत, त्यांचं पालन पोषण करताना शेतकरी जीवाचं रान करत आहेत. ब्रह्मनाळमधील गल्यांमध्ये जनावरं दिसत आहेत. काही गावांमध्ये जनावरं घराच्या छतावर/टेरेसवर बांधली आहेत.

गावातून बाहेर पडण्यासाठी रांगा

दरम्यान पुराने वेढलेल्या गावातून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मनाळ गावात अक्षरश: रांग लागली आहे. खाण्या-पिण्याची काहीही व्यवस्था नाही, सरकारी मदत नाही, पिण्याचं पाणी नाही, त्यामुळे या गावातील नागरिक आसऱ्यासाठी सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें