गडचिरोलीत पुरामुळे घरांसह शेतीचे नुकसान, लवकरात लवकर मदत देण्याचे एकनाथ शिंदेंचं आश्वासन

| Updated on: Aug 31, 2020 | 3:51 PM

मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde on Vidarbha Flood) सांगितले.

गडचिरोलीत पुरामुळे घरांसह शेतीचे नुकसान, लवकरात लवकर मदत देण्याचे एकनाथ शिंदेंचं आश्वासन
Follow us on

नागपूर : विदर्भातील पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. “गडचिरोलीत झालेल्या नुकसानीची पाहणी करुन लवकरात लवकर मदत जाहीर करु,” अशी माहिती नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde on Vidarbha Flood)

“गडचिरोलीत महापुरामुळे शेती आणि घराचंही नुकसान झालं आहे. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाहणी झाल्यानंतर लवकरात लवकर मदत जाहीर करु,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांना मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “अद्याप कोरोनाचं संकट संपलेले नाही. मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊ,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

“तसेच राज्यातील मंदिर उघडण्याबाबत राज्य सरकार परिस्थितीनुसार निर्णय घेईल,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

गडचिरोलीला तिसऱ्यांदा पुराचा फटका

गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगज, अहेरी सिरोंचा या चार तालुक्यांना अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हजारो हेक्टर शेतीला पुराचा फटका बसला आहे. रात्रीपासून आतापर्यंत 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्याला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. 10 दिवसांपूर्वी आलेल्या पुराचे आतापर्यंत पंचनामे सुध्दा करण्यात आले नाही, तोच आता पुन्हा एकदा गडचिरोलीला पुराने वेढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विदर्भाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील जवळपास 10 मार्ग बंद झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज या तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. जवळपास 200 घरे पाण्याखाली गेली आहेत. तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. (Eknath Shinde on Vidarbha Flood)

संबंधित बातम्या : 

पूरस्थितीतही पावसाचा जोर वाढताच, पुण्यातील एनडीआरएफच्या 4 तुकड्या विदर्भाकडे रवाना

Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा