अवाढव्य डोकं, हेल्मेट बसेना, गुजरात पोलीस म्हणाले…

| Updated on: Sep 18, 2019 | 6:48 PM

देशात केंद्र सरकारकडून वाहतुकीच्या नियमात (Traffic Rules) बदल केले आहे. त्यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई पोलीस करत आहे.

अवाढव्य डोकं, हेल्मेट बसेना, गुजरात पोलीस म्हणाले...
Follow us on

अहमदाबाद : देशात केंद्र सरकारकडून वाहतुकीच्या नियमात (Traffic Rules) बदल केले आहेत. त्यामुळे वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई पोलीस करत आहे. या दरम्यान गुजरातमधील उदेपूर जिल्ह्यात पोलिसांनी विना हेल्मेट (Without Helmet) दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला पकडले. पण त्याच्यावर दंड आकारु शकले नाही. याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

नुकतेच गुजरातमध्ये जाकीर मेमन नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी विना हेल्मेट (Without Helmet) गाडी चालवताना पडकले. त्याच्याकडे गाडी संबधित सर्व कागदपत्र होते, पण त्याने हेल्मेट घातले नव्हते. जाकीरने हेल्मेट घातले नव्हते कारण त्याच्या मापाचे हेल्मेट त्याला कुठे मिळत नाही. त्याचं हे कारण ऐकून पोलिसही हैराण झाले.

पोलिसांनीही हेल्मेट त्याच्या डोक्यात घालून तपासले तेव्हा हे खरं असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर दंड आकारला नाही. जाकीर मेमनचे हेल्मेट न घालण्याचे कारण ऐकून सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही त्याचे फोटो व्हायर झाले आहेत. ज्यामध्ये तो डोक्यात हेल्मेट घालत आहेत. पण हेल्मेट डोक्यात जात नसल्याचे दिसत आहे.

“मी शहरातील सर्व दुकानांमध्ये माझ्या मापाचे हेल्मेट शोधलं पण कुठेच मिळत नाही. माझ्या मापाचे हेल्मेट कोणत्याच बाजारात उपलब्ध नाही. मी कायद्याचा आदर करतो. मला पण हेल्मेट घालण्याची इच्छा आहे. पण माझ्या मापाचे हेल्मेट मिळत नाही”, असं जाकीर मेमनने पोलिसांना सांगितले.

“जाकीरची ही सर्वात वेगळी समस्या आहे. पण त्याची यामध्ये काही चुकी नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर दंड आकारु शकत नाही. त्याच्याकडे सर्व वैध कागदपत्र आहेत. हेल्मेट न वापरणे ही त्याची मजबूरी आहे”, असं बोडेलीचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक वसंत राठवा यांनी सांगितले.