Bihar Election | जीतन राम मांझी यांची काँग्रेस आणि राजदला ऑफर, बिहारमधील राजकारण तापलं

| Updated on: Nov 12, 2020 | 6:25 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवं सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार कवायती सुरु आहेत.

Bihar Election | जीतन राम मांझी यांची काँग्रेस आणि राजदला ऑफर, बिहारमधील राजकारण तापलं
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवं सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार कवायती सुरु आहेत. एकिकडे एनडीएने आपलं सरकार स्थापन होणार असं घोषित केलं असलं, तरी दुसरीकडे राजदचे तेजस्वी यादव देखील आपल्या आमदारांना आपलंच सरकार येणार असं आश्वासन देत आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यात आता बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी काँग्रेस-राजदला एक ऑफर दिलीय. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (HAM party chief Jitan Ram Manjhi offers to Congress and RJD MLAs).

जीतन राम मांझी यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राजदला मुख्यमंत्री नितीश कुमार (Cm Nitish Kumar) यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, “काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत यायला हवं. नितीश कुमार सर्वांचे नेते आहेत. त्यांची धोरणं आणि काँग्रेसची धोरणं फार वेगळी नाहीत. राजद आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांनी बिहारच्या विकासासाठी एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा द्यावा.”

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जीतन राम मांझी यांनी राजद-काँग्रेसला घातलेल्या या राजकीय सादेने राजकारणात चर्चांना उधाण आलंय. या आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत यावं असं आवाहन केल्यानं अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहेत. एनडीए आणि महागठबंधन दोन्ही आघाड्यांकडून आपलंच सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला जातोय. आज (12 नोव्हेंबर) पाटणात राजद आमदारांनी तेजस्वी यादव यांना विधीमंडळ नेता म्हणूनही निवडलं आहे. त्यात तेजस्वी यांनी आपलंच सरकार येणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर तेजस्वी बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव कशी करणार असाही प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष असल्याचं बोललं जातंय. माजी खासदार आणि काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार अखिलेश सिंह यांनी पराभवाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल असं म्हटलंय.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला आहे. यासह त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 122 चा बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. त्यामुळे एनडीएचंच सरकार स्थापन होणार अशीच शक्यता आहे. मात्र, त्यात राजद-काँग्रेसच्या हालचालींनी राजकारण तापलं आहे. राजदच्या नेतृत्वातील महागठबंधनला 110 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी दोन्हींच्या मतांच्या टक्केवारीत फार कमी फरक आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनचं सरकार बनता बनता राहिल्याचं बोललं जातंय.

महागठबंधनला सरकार स्थापन करण्यात यश आलं नसलं तरी एकूण मतदानाच्या सर्वाधिक मतं मिळवण्यात त्यांना यश आलंय. महागठबंधनला 37.23 टक्के मतं मिळाली आहे, तर एनडीएला 37.26 टक्के मतं मिळाली आहेत. दोघांच्या मतांमध्ये केवळ 0.03 टक्क्यांचा फरक आहे.

संबंधित बातम्या :

बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक

तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी, भविष्य त्यांचंच, ‘सामना’तून कौतुकाचा वर्षाव

तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

HAM party chief Jitan Ram Manjhi offers to Congress and RJD MLAs