AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी, भविष्य त्यांचंच, ‘सामना’तून कौतुकाचा वर्षाव

तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राजदचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी, भविष्य त्यांचंच, 'सामना'तून कौतुकाचा वर्षाव
| Updated on: Nov 12, 2020 | 7:20 AM
Share

मुंबई : “तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे”, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राजदचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक करण्यात आलं आहे. (Sanjay Raut Appriciate Tejashwi Yadav Through Samana Editorial)

“तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल”, असं सामनामध्ये म्हटलंय.

“बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकडय़ांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपस लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे”, असंही सामनामध्ये म्हटलंय.

सामना अग्रलेखात म्हटलंय, 

“अटीतटीच्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस 125 जागा मिळाल्या. विधानसभा 243 आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत 122 चे आहे. पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस 110 जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा 100 ते 300 च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघांत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून ‘जागा’ लाटल्या, असा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. ‘राजद’ने 119 विजयी उमेदवारांची यादीच घोषित केली. पण निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.”

त्यातले काय ते नितीशबाबूंनाच माहीत. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशपुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रिपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे.”

(Sanjay Raut Appriciate Tejashwi Yadav Through Samana Editorial)

संबंधित बातम्या

अमेरिका निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा, ‘सामना’ अग्रलेखातून बिहार निकालाचेही भाकित

‘घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर हिंसाचारावर तुमची थोबाडे बंद का?’, शिवसेनेचा ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...