AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा, ‘सामना’ अग्रलेखातून बिहार निकालाचेही भाकित

हिंदुस्थानने 'नमस्ते ट्रम्प' केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना 'बाय बाय' करुन चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखवण्यात आली, पण लोकांनी बहुदा स्पष्टच सांगितले, "आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!"

अमेरिका निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा, 'सामना' अग्रलेखातून बिहार निकालाचेही भाकित
| Edited By: | Updated on: Nov 09, 2020 | 10:07 AM
Share

मुंबई: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना चितपट करुन जो बायडन यांनी दणदणीत विजय मिळवला. तो धागा पकडत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवश्चकंठश्च मैत्रीवर बोट ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर बिहारच्या निकालाबाबत प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनंतर सत्तांतर अटळ असल्याचा दावाही सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. (Shiv Sena once again criticizes Prime Minister Modi in Saamana editorial)

हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करुन चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखवण्यात आली, पण लोकांनी बहुदा स्पष्टच सांगितले, “आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!” अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हिच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर बोठ ठेवत बिहार निवडणुकीबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

अमेरिकेत सत्तांतर, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहेस बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीली आकांडतांडव केले, तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानातील बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकळाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काठण्याचे काम लोकांनाच करायचे असते.

‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधीची उधळपट्टी

“हिंदुस्थानातील भाजप पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’ साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत होते. ट्रम्प यांना ऐन कोरोना काळात गुजरातमध्ये आमंत्रित करुन सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले हे नाकारता येत नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे.”

“लोकशाहीत जय आणि पराजय हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरुन जे तांडव सुरु केले आहे. ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहमे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल.” अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून भाजप, पर्यायाने मोदी सरकारला उपरोधिक सल्ला देण्यात आला आहे.

भाजपवर थेट आरोप

व्यक्तीगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखवले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरुन अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच कमला हॅरिसबाईंच्या विजयाबाबत आनंद व्यक्त करत असतील तर हा ‘ट्रम्प’ छाप विनोद म्हणावा लागेल.

तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाल लागला नाही

हिंदुस्थानातील बिहारमध्येही तसेच संत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरु शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडलेस ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

‘घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर हिंसाचारावर तुमची थोबाडे बंद का?’, शिवसेनेचा ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल

VIDEO | Saamana | दडपलेल्या गुन्ह्याची चौकशी करणे अपराध? दै ‘सामना’तून भाजपच्या आंदोलनाचा समाचार

Shiv Sena once again criticizes Prime Minister Modi in Saamana editorial

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.