पुण्यात हत्येचा थरार, कारवर बोलेरो ठोकून गोळ्या झाडल्या, गाडीतून बाहेर काढून कोयत्याने वार

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर नारायणपूरजवळ भर रस्त्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. हसन शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन शेखवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. महत्त्वाचं म्हणजे कारला बोलेरो धडकवून मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्यावर वार करुन हसन शेखची हत्या करण्यात आली. भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार […]

पुण्यात हत्येचा थरार, कारवर बोलेरो ठोकून गोळ्या झाडल्या, गाडीतून बाहेर काढून कोयत्याने वार
Follow us

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर नारायणपूरजवळ भर रस्त्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. हसन शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन शेखवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. महत्त्वाचं म्हणजे कारला बोलेरो धडकवून मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्यावर वार करुन हसन शेखची हत्या करण्यात आली. भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार रंगला. या घटनेमुळे परिसरात एकच भीती पसरली आहे.

हसन शेख नारायणपुरातून कारने निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी बोलेरो गाडीने त्याच्या कारला धडक दिली. अक्षरश: फिल्मी स्टाईलने त्याच्या कारला धडक मारुन गाडी रोखली. त्यानंतर थेट त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाही तर हसन शेखला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करुन मारेकरी पसरा झाले.

या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हसन शेखवर यापूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. 2015 मध्ये त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. त्या हल्ल्यातून बचावलेला हसन शेख काही दिवस कोमात होता. गेल्या काही दिवसांपासून तो हॉटेल व्यवसाय करत होता. मात्र आज त्याच्यावर पुन्हा हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI