AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरावर भयंकर परिणाम करतेय तुमची ‘ही’ रोजची सवय, आधी करा बंद

तुमच्या दैनंदिन जीवनात असे अनेक पदार्थ आहेत ज्याने तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

शरीरावर भयंकर परिणाम करतेय तुमची 'ही' रोजची सवय, आधी करा बंद
| Updated on: Oct 01, 2020 | 5:54 PM
Share

मुंबई : जगभरात सध्या कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाचा धोका असताना आरोग्याविषयी जागरूक असणं महत्त्वाचं झालं आहे. अशात शरीरात होणार छोटेसे बदलही मोठा परिणाम करू शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनात असे अनेक पदार्थ आहेत ज्याने तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. खरंतर, अनेकांची दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने होते. पण याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. कॉफी म्हटलं की घरच काय तर ऑफिसमध्ये कॉफी प्यायल्यानंतर अनेकांना काम करण्याची भलतीच एनर्जी मिळते. पण तुमचं हेच आवडतं पेय आरोग्यावर हानिकारक परिणाम करतं. (health and fitness drinking coffee can risk on health )

कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हालाही जर कॉफी पिण्याची सवय असेल तर तुमच्या शरीरात होणाऱ्या या बदलांवर दर्लुक्ष करू नका.

डोकेदुखी आणि चिडचिड होणे जर तुम्हाला डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणं, चिडचिड होत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या कॉफीने आता शरीरावर वाईट असर करण्यास सुरुवात केली आहे. कारण, कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर कॉफी पिणं तातडीने कमी करणं आवश्यक आहे.

झोप न येणं जर तुम्ही संध्याकाळच्या सुमारास कॉफी पित असाल तर हे तुमच्यासाठी अतिशय धोक्याचं आहे. कॉफीमुळे तुम्हाला झोप येण्यासाठी त्रास होतो. ज्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेपर्यंत जागे राहता. शरीरात कॅफिनचा असर हा कमीत कमी 4 ते 5 तास राहतो. त्यामुळे तुमची झोप अपूरी राहते.

आळस आणि थकवा येणं आपण नेहमी थकवा घालवण्यासाठी कॉफी पितो. पण तुम्हाला माहिती आहे का, कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराचा दिनक्रम उलट्या पद्धततीने काम करण्यास सुरुवात करते. ज्यामुळे तुम्हाला आळस आणि थकवा जाणवतो. (health and fitness drinking coffee can risk on health )

हृदयात जळजळ होणे कॉफी अॅसिडिक असते. ज्याच्या सेवनामुळे शरीरात गॅस तयार होतो. त्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीसाही त्रास जाणवतो.

पोटात दुखणं जर तुम्ही रिकाम्या पोटी कॉफीचं सेवण केलं तर तुमच्या शरीरात गॅस तयार होऊ शकतो. ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार उद्भवतात.

तणाव आणि अपचन अनेक लोक उशिरापर्यंत काम करत कॉफीचं सेवन करतात. पण यामुळे तुमची स्ट्रेल लेव्हल वाढू शकते. कारण, कॅफिन आपल्या शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढवतं, जे एक स्ट्रेस हॉर्मोन आहे.

संबंधित बातम्या – 

कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

health and fitness drinking coffee can risk on health

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.