Ahana Deol | धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन, अहानाला जुळी कन्यारत्ने!

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र देओल पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कनिष्ठ मुलगी अहाना देओल (Ahana Deol) हिने जुळ्या मुलींना (Baby Girls) जन्म दिला आहे.

Ahana Deol | धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन, अहानाला जुळी कन्यारत्ने!

मुंबई : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र देओल पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कनिष्ठ मुलगी अहाना देओल (Ahana Deol) हिने जुळ्या मुलींना (Baby Girls) जन्म दिला आहे. शुक्रवारी अहानाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे (Hema malini Dharmendra deol’s daughter ahana blessed with twin baby girls).

अहानाने आनंद व्यक्त करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या जुळ्या मुली अस्ट्रिया आणि आदिया यांच्या आगमनाच्या बातमीमुळे आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला. 26 नोव्हेंबर 2020. प्राउड पेरेंट्स अहाना आणि वैभव. एक्सायटेड ब्रदर डॅरियन वोहरा. सुपर हॅप्पी दादा-दादी पुष्पा आणि विपिन वोहरा, नानी-नाना हेमा मालिनी आणि धर्मेंद्र देओल.’

आहानाने खास अंदाजात आपल्या चिमुकल्यांच्या आगमनाची बातमी सर्वांना दिली आहे. तर, दुसरीकडे धर्मेद्र आणि हेमा मालिनी यांच्यावरदेखील अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. या आनंदाच्या बातमीने देओल परिवारात उत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे.

दिल्लीच्या व्यावसायिकाशी लग्नगाठ

बरेचदा माध्यमांपासून दूर राहणाऱ्या अहाना देओलने 2014मध्ये दिल्ली स्थित व्यापारी विपिन वोहरा यांचा मुलगा वैभव वोहरा याच्याशी लग्न केले. वैभव स्वत: देखील एक व्यापारी आहे. 2015 मध्ये अहाना आणि वैभव यांचा मुलगा डॅरियन वोहरा याचा जन्म झाला होता (Hema malini Dharmendra deol’s daughter ahana blessed with twin baby girls).

(Hema malini Dharmendra deol’s daughter ahana blessed with twin baby girls).

अहाना देओल चित्रपटांपासून दूर

कुटुंबाप्रमाणेच अहानानेदेखील चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एका चित्रपटानंतरच तिने काम थांबवले. ‘न तुम जानो ना हम’ या चित्रपटात अहानाने काम केले होते. हृतिक रोशन, ईशा देओल आणि सैफ अली खान यांच्यासह अहानाने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

2010मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय स्टारर फिल्म ‘गुजारिश’ या चित्रपटात अहानाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर तिने ना कोणत्या चित्रपटाला मदत केली, ना अभिनेत्री म्हणून चित्रपटात काम केले.

ईशाला देखील दोन मुली…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल देखील दोन मुलींची आई आहे. 2012मध्ये उद्योगपती भरत तख्तानीशी लग्न करणार्‍या ईशाने ऑक्टोबर 2017 मध्ये पहिली मुलगी राध्या आणि जून 2019मध्ये दुसरी मुलगी मिराया यांना जन्म दिला होता.

(Hema malini Dharmendra deol’s daughter ahana blessed with twin baby girls)

Published On - 2:30 pm, Sat, 28 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI