Manmeet Grewal | नवी मुंबईत टीव्ही स्टारचा गळफास, लॉकडाऊनमुळे पैसे थांबले, घरभाडेही रखडल्याने टोकाचं पाऊल

| Updated on: May 16, 2020 | 8:01 PM

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला हिंदी टीव्ही स्टार मनमीत ग्रेवाल याने गळफास घेत आत्महत्या केली.

Manmeet Grewal | नवी मुंबईत टीव्ही स्टारचा गळफास, लॉकडाऊनमुळे पैसे थांबले, घरभाडेही रखडल्याने टोकाचं पाऊल
Follow us on

मुंबई : हिंदी टीव्ही स्टार मनमीत ग्रेवाल याने गळफास घेत (Manmeet Grewal Commit Suicide) आत्महत्या केली आहे. 32 वर्षीय मनमीत ग्रेवाल हा लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये होता. कर्जात बुडाल्याने त्याने हे टोकाचं (Manmeet Grewal Commit Suicide) पाऊल उचललं आहे.

नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका छोट्याश्या फ्लॅटमध्ये मनमीत ग्रेवाल त्याच्या पत्नीसोबत राहत होता. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी (15 मे) रात्री जवळपास साडे दहाच्या सुमारास गळफास घेत (Manmeet Grewal Commit Suicide) आत्महत्या केली.

मनमीत ग्रेवाल याने सब टीव्हीवरील ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ मालिकेत काम केलं आहे.

घराचं भाडं देणंही कठीण झालं होतं

मनमीत ग्रेवाल हा लॉकडाऊनमुळे चिंतेत होता. त्याच्यावर आधीपासूनच कर्ज होतं. आर्थिक अडचणीमुळे तो तणावाखाली होता. त्यातच लॉकडाऊन घोषित झाल्याने पैसे येणंही बंद झालं होतं. लॉकडाऊनमध्ये काम मिळत नसल्याने तो तणावाखाली होता. त्याच्याकडे घर भाडं द्यायलाही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे.

वेब सीरीजमध्ये काम करत होता मनमीत ग्रेवाल

मनमीत ग्रेवाल हा हिंदी मालिकांमध्ये काम करायचा. शिवाय, त्याने अनेक जाहिरातीही केल्या आहेत. सध्या तो 8 एपिसोड असलेल्या एका वेब सीरीजमध्ये काम करत होता. यापैकी तीन एपिसोड्समध्ये तो दिसणार होता.

Manmeet Grewal Commit Suicide

संबंधित बातम्या :

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र

25 वर्षांची साथ सुटली, आमिर खानच्या सहाय्यकाचं निधन

कॅन्सरशी लढा संपला, ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेते शफीक अन्सारी कालवश

कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन