25 वर्षांची साथ सुटली, आमिर खानच्या सहाय्यकाचं निधन

आमोस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर आमिर खान, किरण राव आणि टीमने धावाधाव करत त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले होते (Aamir Khan Longtime Assistant Amos Dies Of Heart Attack)

25 वर्षांची साथ सुटली, आमिर खानच्या सहाय्यकाचं निधन

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याची दीर्घकाळापासून साथ देणारे सहाय्यक आमोस यांचे मंगळवारी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर आमोस यांची प्राणज्योत मालवली. आमिर खान आणि त्याची पत्नी-दिग्दर्शिका किरण राव यांना मोठा धक्का बसला आहे. (Aamir Khan Longtime Assistant Amos Dies Of Heart Attack)

वयाच्या 60 व्या वर्षी आमोस यांचे निधन झाले. गेल्या जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते आमिर खानच्या सोबत होते. मंगळवार (12 मे) सकाळी आमोस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर आमिर खान, किरण राव आणि टीमने धावाधाव करत त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

“आमोस यांनी एका सुपरस्टारबरोबर काम केले, पण ते तितकेच प्रेमळ आणि साधे होते. ते फक्त आमिरच नाही, तर सर्वांशीच मायेने वागायचे. त्यांनी सर्वांना जीव लावला. आमोस एक अद्भुत व्यक्ती होती. ते खूपच तेजस्वी आणि मेहनती होते,” अशी आठवण आमिरचा जवळचा मित्र करीम हाझी यांनी सांगितली.

हेही वाचा : कॅन्सरशी लढा संपला, ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन

“त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू धक्कादायक आहे. कार्यतत्पर असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं. आमिर आणि किरण दोघेही धक्क्यात आहेत. आमिरने आम्हाला निरोप पाठवला होता आणि तो म्हणाला, हे कधीही न भरुन निघणारे नुकसान आहे. आम्ही सुन्न होतो, आम्हाला त्याची नेहमी आठवण येईल,” असंही हाझी यांनी सांगितलं.

हेही वाचा : कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

आमोस नुकतेच आजोबा झाले होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. आमोस यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. (Aamir Khan Longtime Assistant Amos Dies Of Heart Attack)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *