…तरच लग्न करेन, मुस्लीम तरुणाला लग्नासाठी मुलीची अट

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

गांधीनगर : मुस्लीम मुलासोबत लग्न करण्यासाठी एखाद्या हिंदू मुलीने तिचा धर्म, संस्कृती सर्वकाही सोडून मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं आपण अनेकदा ऐकलं आणि बघितलं असेल. मात्र, गुजरातमध्ये मुस्लीम-हिंदू विवाहासंबंधी एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. एका हिंदू मुलीने पोलिसांकडे एक अर्ज दाखल केला, की ती मुस्लीम मुलाशी लग्न करेल पण एका अटीवर. या अर्जात तिने मुस्लीम मुलाशी […]

...तरच लग्न करेन, मुस्लीम तरुणाला लग्नासाठी मुलीची अट
Follow us on

गांधीनगर : मुस्लीम मुलासोबत लग्न करण्यासाठी एखाद्या हिंदू मुलीने तिचा धर्म, संस्कृती सर्वकाही सोडून मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं आपण अनेकदा ऐकलं आणि बघितलं असेल. मात्र, गुजरातमध्ये मुस्लीम-हिंदू विवाहासंबंधी एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. एका हिंदू मुलीने पोलिसांकडे एक अर्ज दाखल केला, की ती मुस्लीम मुलाशी लग्न करेल पण एका अटीवर. या अर्जात तिने मुस्लीम मुलाशी लग्न करण्यासाठी एक अट ठेवली आहे. ती त्या मुस्लीम मुलाशी तेव्हाच लग्न करेल जेव्हा तो हिंदू धर्माचा स्वीकार करेल आणि शाकाहारी बनेल. कुठल्याही हिंदू मुलीने मुस्लीम प्रियराशी लग्न करण्यापूर्वी अशा प्रकारची अट ठेवल्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल.

गुजरातच्या सुरत येथील कतारगाम येथे ही घटना घडली आहे. मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी हे दोघे 22 एप्रिलला घरातून पळून गेले. त्यानंतर ते ननपुराच्या मॅरेज रजिस्टारच्या कार्यालयात लग्न करण्यासाठी गेले. पण, तिथे मुलीचे नातेवाईक पोहोचले. त्यामुळे हे दोघेही तिथूनही पळून गेले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. काहीच दिवसांत पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही एक दिवसानंतर सोडून दिलं. ते दोघेही बालिक होते. मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होतं. त्यामुळे ते दोघे त्यांचे निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असं सांगत पोलिसांनी या दोघांनाही सोडून दिलं.

त्यानंतर मुलगी तिच्या घरी गेली. एका दिवसानंतर कतारगाम पोलिसांना त्या मुलीने एक अर्ज पाठवला. “आम्ही दोघेही लग्नासाठी तयार होतो, पण त्यासाठी एक अट होती. ती अट आताही आहे. त्याने हिंदू धर्म स्वीकारावा आणि शाकाहारी व्हावं, तरच मी त्याच्याशी लग्न करेल”, असं त्या अर्जात लिहिलं होतं. या अर्जाची एक प्रत त्या मुस्लीम मुलालाही पाठवण्यात आली आहे, असेही त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. कतारगाम पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक ए. आर. राठोड यांनी याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची खास पत्रिका, किंमत तब्बल….

मी ‘गे’ नाही, ‘बॉयफ्रेंड’ सोबतच्या फोटोवरील चर्चेनंतर फॉकनरचे स्पष्टीकरण

इंजिनिअर नवविवाहितेवर सावकाराचा बलात्कार, सिगारेटचे चटके

नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज