Anil Deshmukh | 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई, गृहमंत्र्यांचा पडळकरांना इशारा

| Updated on: Jun 28, 2020 | 4:23 PM

पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांनी एण्ट्री घेतली होती

Anil Deshmukh | 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई, गृहमंत्र्यांचा पडळकरांना इशारा
Follow us on

सांगली : 100 गाड्यांचा ताफा घेऊन दौरा करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा पाय आणखी खोलात शिरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. (Home Minister Anil Deshmukh warns action against Gopichand Padalkar)

सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्वांना सारखे आहेत. ते न पाळता आणि मास्क न वापरता कोणीही फिरत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर पोलिसांकडे तक्रारी आल्या, तर पोलीस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करतील, असं गृहमंत्री म्हणाले. “इथे सांगलीचे एसपी (पोलिस अधीक्षक) आहेत. याची नोंद त्यांनी घेतली. जे कोणी 100 गाड्या सोबत घेऊन फिरत असतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा अनिल देशमुख यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांनी एण्ट्री घेतली होती

हेही वाचा : पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणं महागात, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

“एखादे आयुर्वेदिक औषध मार्केटमध्ये आणायचं असेल, तर आयुष मंत्रालय किंवा आयसीएमआर विभागाची परवानगी घ्यावी लागते. यांची परवानगी असेल तर बाजारात तुम्ही औषध आणू शकता. रामदेव बाबांना त्या औषधाबाबत आयुष किंवा आयसीएमआरने कोणतीही ‘ना हरकत’ दिलेली नाही” अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली.

हेही वाचा : Gopichand Padalkar | पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक

रामदेव बाबांनी जे औषध आणले, ते जर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे असेल, पण त्याच्यामुळे ‘कोरोना’ बरा होतो, अशी मिसलिडिंग जाहिरात केली, तर रामदेव बाबा असो किंवा कोणीही, आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करु, या औषधावर लिहिले असेल की यामुळे कोरोना बरा होतो, तर त्यावर आम्ही कारवाई करणार, असा इशाराही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.