Health | ‘वर्क फ्रॉम होम’मुळे डोळ्यांवर ताण, डोळे दुखी कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा!

| Updated on: Nov 25, 2020 | 7:16 PM

दिवसभर सतत लॅपटॉपवर काम करणे, टीव्ही पाहणे, सतत मोबाईल पाहणे या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल डोळ्यांवर अधिक ताण येऊ लागला आहे.

Health | ‘वर्क फ्रॉम होम’मुळे डोळ्यांवर ताण, डोळे दुखी कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा!
Follow us on

मुंबई : दिवसभर सतत लॅपटॉपवर काम करणे, टीव्ही पाहणे, सतत मोबाईल पाहणे या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल डोळ्यांवर अधिक ताण येऊ लागला आहे. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ वाढणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यांच्या नसा दुखणे अशा अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. कधी कधी वेगवेगळ्या कारणांनी डोळ्यांची जळजळ होते. तणाव अथवा अलर्जीमुळेही असे होऊ शकते. तसेच सध्याचे वाढते प्रदूषण हेदेखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरते (Home Remedies for Eye pain).

डोळ्यांवर पडणारा ताण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या या समस्यांवर घरच्या घरीदेखील उपाय करू शकता. डोळे दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे यामुळे डोळ्यांना त्रास होऊ लागतो. अशी लक्षणे जाणवू लागल्यावर घरगुती उपाय नक्की काय करायचे, हे आपण जाणून घेऊया.

डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याची कारणे :

डोळ्यांना बरेचदा धुळीची अथवा अन्य अलर्जी असले तर डोळ्यांचे दुखणे वाढते. तसेच काही जणांना चुकून जरी तिखटाचा हात डोळ्यांना लागला तरी, डोळ्यांचे दुखणे वाढते. अशा प्रकारच्या अलर्जीमुळे डोळेदुखी अधिक वाढते आणि त्रास होतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने डोळ्यांना झालेले इन्फेक्शनदेखील डोळेदुखीसाठी कारणीभूत ठरते. तसेच, सतत काम केल्याने डोळ्यांची जळजळ होऊन डोळे लाल होतात (Home Remedies for Eye pain).

टी बॅग्ज

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे काढण्यासाठी टी-बॅग्ज उपयोगी पडतात याची सर्वांनाच माहिती आहे. पण डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. ग्रीन टी अथवा कॅमोमाईल टीचा यासाठी उपयोग करून घेता येतो. डोळ्यांची जळजळ होत असल्यास टी बॅग्जचा वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी चहासाठी वापरण्यात आलेल्या टी बॅग्ज फेकून न देता फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा डोळ्यांना जळजळ जाणवेल तेव्हा फ्रिजमधील चहाची ही बॅग काढा आणि डोळ्यावर ठेवा. ही थंड बॅग तुम्ही डोळ्यांवर ठेऊन काही वेळ तसेच पडून राहा. दोन ते तीन दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला डोळ्यात अजिबात जळजळ जाणवणार नाही (Home Remedies for Eye pain).

काकडी

काकडीचा उपयोग डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि लालसरपणा घालविण्यासाठीही होतो. त्वचा सुंदर राखण्यासाठी जितका काकडीचा उपयोग होतो तितकाच डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठीही होतो. काकडीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉईड्स हे डोळे दुखणे आणि डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी  फायदेशीर ठरतात. याचा कोणताही दुष्परिणाम डोळ्यांवर होत नाही. यासाठी काकडीचे स्लाईस कापून घ्या आणि ते काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा. त्यानंतर त्या काप डोळ्यांवर साधारण 10 मिनिट्स ठेवा. साधारण अर्धा तासाने तुम्हाला डोळ्यांवर परिणाम जाणवेल.

(Home Remedies for Eye pain)

टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.