आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा

| Updated on: Apr 13, 2022 | 12:02 AM

घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही.

आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ‘घर मालकाला (Homeowner) स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी (Permission of the Society) कशासाठी? घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची ( society noc) काहीच गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी केली आहे.जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे घर विक्री करताना घरमालकांना त्याचा फायदा होणार आहे.

ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केल आहे. तसंच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रथा मोडीत काढली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. घराची विक्री करताना, त्याचा व्यवहार करताना सोसायटीची परवानगी लागत असल्याने वेळ वाया जात होता, आता या निर्णयामुळे घरमालकांना त्यांचे घर विकताना कमी त्रास सोसावा लागणार आहे.

घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात गुजराती गुजराती यांना जैन जैन यांना तर शाकाहारी शाकाहारी यांनाच विकतात. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे’ असं आव्हाड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Dhananjay Munde heart attack : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

Skymet Weather Monsoon 2022 : औंदाही वरुणराजा चांगला बरसणार, बळीराजाला सुखावणारं स्कायमेटचं पहिलं भाकीत

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: ‘हे सगळे लवंडे’, संजय राऊतांच्या शिवराळपणाचे राज ठाकरेंकडून अक्षरश: वाभाडे