Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा

| Updated on: Oct 24, 2020 | 8:20 AM

हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबरला लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी मागितली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 12 ते 14 राज्यांमध्ये तब्बल 20,000 अधिक लोकांनावर याची चाचणी करण्यात येणार आहे.

Coronavirus Vaccine: पुढच्या वर्षी जूनपर्यंत येणार कोरोनाची देशी लस, भारत बायोटेकचा दावा
जगभरात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लस तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये रशिया सगळ्यात आघाडीवर आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, रशियाने कोरोना व्हायरसची तिसरी लसदेखील तयार केली असल्याचा दावा केला आहे. रशियाने ऑगस्टमध्ये स्पुतनिक व्ही (Sputnik V) ची पहिली लस सुरू केली. यानंतर, 14 ऑक्टोबरला, एपिवाककोरोना (EpiVacCorona) ही दुसरी लस आली आणि आता रशियाची तिसरी लस देखील तयार आहे.
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस (Coronavirus) सारख्याच जीवघेण्या संसर्गावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यातच भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) देशी कोरोनाव्हायरस लस (Covid 19 Vaccine) ‘कोवॅक्‍सिन’ (Covaxin) वर काम करत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कंपनीने या लसीचा तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी दिली तर या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसची ही देशी लस पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. (icmr based coronavirus covid 19 vaccine launch in june said by bharat biotech)

हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबरला लसीच्या तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी मागितली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 12 ते 14 राज्यांमध्ये तब्बल 20,000 अधिक लोकांनावर याची चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक साई प्रसाद म्हणाले की, कंपनीला वेळीच सर्व परवानग्या मिळाल्या तर 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लसीच्या तिसर्‍या क्लिनिकल चाचणीवर आम्हाला काम करता येईल.

‘रोहित पवारांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही धंदा केला’

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या मदतीने विकसित केलेली कोवॅक्सिन ही लस एक शक्तिशाली रोगप्रतिकारक प्रणाली विकसित करण्यासाठी कोविड -19 विषाणूला ठार करण्यास मदत करेल.

दरम्यान, भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियादेखील कोरोना व्हायरसवर ‘कोवीशील्ड’ लस तयार करत आहे. भारत बायोटेक पेक्षाही कोवीशील्ड लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू असून ही लस लवकरच वापरासाठी येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरूवात केली असून आता त्याचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वार

(icmr based coronavirus covid 19 vaccine launch in june said by bharat biotech)