ऑफिसमध्ये 15 मिनिटंही जास्त काम केलं तर मोजणार ओव्हरटाईम? सरकारचा नवा नियम

| Updated on: Feb 15, 2021 | 9:05 AM

नवीन नियमांनुसार जर ठरलेल्या तासांपेक्षा 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केलं तर ते ओव्हरटाइमच्या श्रेणीमध्ये मोजलं जाईल आणि यासाठी कंपनीला कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ऑफिसमध्ये 15 मिनिटंही जास्त काम केलं तर मोजणार ओव्हरटाईम? सरकारचा नवा नियम
Follow us on

नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षापासून नवीन कामगार कायद्या लागू करण्यासाठी सरकारने वेगाने कामाला सुरूवात केली आहे. यामध्ये आता सरकार जादा कामाची सध्याची मर्यादा बदलण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. नवीन नियमांनुसार जर ठरलेल्या तासांपेक्षा 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केलं तर ते ओव्हरटाइमच्या श्रेणीमध्ये मोजलं जाईल आणि यासाठी कंपनीला कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (If you work more than 15 minutes in office will you count the overtime new rule of government)

लाईव्ह हिंदुस्तानने यासंबंधी वृत्त दिलं आहे. आधी ठराविक शिफ्ट व्यतिरिक्त अर्धा तासांची मुभा होती. त्यानंतर ओव्हरटाईम मोजला जायचा. पण आता ही मर्यादा बदलून कंपनी 15 मिनिटं जास्त काम केल्यास त्याला ओव्हराटाईममध्ये मोजणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर अद्याप सरकार काम करत असून लवकरच यासंबंधी अधिकृत माहिती समोर येईल.

अशात नवीन कामगार कायद्यांतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्‍यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. हे कायदे लागू करून देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आराखडा अंतिम झाल्यामुळे कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.

याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.

चार कामगार कायदे 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील

कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. (If you work more than 15 minutes in office will you count the overtime new rule of government)

संबंधित बातम्या – 

New Labor Act! आता कर्मचार्‍यांना आठवड्यातून 3 दिवसांची मिळणार सुट्टी?

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

(If you work more than 15 minutes in office will you count the overtime new rule of government)