AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : एका महिन्यात सलग चौथ्यांदा… दिवाळीनंतर हवामानात मोठे बदल, या भागांमध्ये धो-धो कोसळणार

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत मिळत आहेत. 13 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम दक्षिण भारतातील पावसावर होऊ शकतो. नेमका कोणत्या भागांना पावसाचा फटका बसणार?

Weather Update : एका महिन्यात सलग चौथ्यांदा... दिवाळीनंतर हवामानात मोठे बदल, या भागांमध्ये धो-धो कोसळणार
Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 6:52 PM
Share

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत अर्णब आणि मुरासू या दोन चक्रीवादळांमुळे चर्चेत आलेल्या बंगालच्या उपसागरात आता आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 13 नोव्हेंबरच्या आसपास आग्नेय बंगालच्या उपसागरात ही प्रणाली विकसित होऊ शकते. एका महिन्यात चौथ्यांदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी अर्णब आणि मुरासू या दोन चक्रीवादळांनी या भागात परिणाम केलेला पाहायला मिळाला होता.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 13 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर पुढील 24 तासांत त्याची तीव्रता वाढून सुस्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. मात्र, याचा अर्थ लगेच चक्रीवादळ तयार होणार असा नाही. हवामान मॉडेल्समध्ये या प्रणालीच्या पुढील प्रवासाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. काही अंदाजांनुसार ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या दिशेने जाऊ शकते, तर काही मॉडेल्स म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता दर्शवत आहेत.

तामिळनाडू, केरळमध्ये पावसाचा जोर वाढणार

नव्या हवामान प्रणालीची दिशा स्पष्ट होण्यापूर्वीच दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 16 नोव्हेंबर रोजी केरळ आणि माहेमध्येही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील शिवगंगा, रामनाथपुरम, तुतीकोरीन आणि तिरुनेलवेली या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कावेरी डेल्टा भागातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे दक्षिण भारतातील हवामानावर पुढील काही दिवस लक्ष ठेवावे लागणार आहे.

मच्छिमारांना सतर्कतेचा सल्ला

बंगालच्या उपसागरातील संभाव्य हवामान बदल लक्षात घेता समुद्रातील परिस्थितीवरही लक्ष ठेवले जात आहे. मच्छिमारांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. नव्या प्रणालीची तीव्रता, तिची दिशा आणि किनारपट्टीवरील संभाव्य परिणाम याबाबत पुढील निरीक्षणानंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Follow Us
अनेक वर्षांचा दुरावा संपला? भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र...
अनेक वर्षांचा दुरावा संपला? भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!