Corona | कठीण काळात आम्ही दिल्लीसोबत, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

| Updated on: Nov 22, 2020 | 8:54 AM

पंजाबतर्फे दिल्लीचे प्रशानन आणि नागरिकांना शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीला दिले आहे.

Corona | कठीण काळात आम्ही दिल्लीसोबत, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Follow us on

चंदीगढ : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबतर्फे दिल्लीचे प्रशानन आणि नागरिकांना शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Punjab Chief Minister Capt Amarinder Singh) यांनी दिल्लीला दिले आहे. सोबतच, पंजाबमध्ये कोरोना योद्ध्ये ज्या प्रकारे कोरोनाशी दोन हात करत आहेत, त्यांच्या या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली आहे. (In corona pandemic will help Delhi to as much as possible said Captain Amarinder Singh)

“देशाची राजधानी दिल्ली सध्या कठीण काळातून जात आहे. दिल्लीची लढाई सुरुच आहे. अशा कठीण काळात आम्ही दिल्लीला जमेल तशी मदत करण्यास तयार आहोत. आम्ही दिल्लीकरांच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध राहू.” असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. तसेच, कोरोची दुसरी लाट कधी येईल हे कुणीही सांगू शकत नाही. राजधानी क्षेत्र आणि इतर राज्यांचे अनुभव पाहून देशात कोरोनाची दुसरी लाट निश्चितपणे येणार असं वाटत आहे , अशी शक्यताही सिंग यांनी व्यक्त केली.

दिल्लीत शनिवारी कोरोनाचे 5879 नवे रुग्ण

दिल्लीत कोरनाग्रस्तांच्या आकड्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्लीत शनिवारी तब्बल 5879 नवे कोरोनाबाधित आढळले. तसेच, शनिवारी एकूण 111 बाधितांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये शनिवारी 6963 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 23 हजार 117 वर गेला आहे. तर आतापर्यंत एकूण 8270 जणांचा कोनोमुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये 39741 सक्रिय रुग्ण आहेत.

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दिल्ली प्रशासनाकडून कठोर कारवाई

दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन दिल्ली प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे. यावेळी, शनिवारी मास्क न वापरल्यामुळे दिल्ली पोलिसांनी एकूण 1306 नागरिकांवर कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण 5 लाख 1 हजार 328 नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे 3378 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (In corona pandemic will help Delhi to as much as possible said Captain Amarinder Singh)

संबंधित बातम्या :

Corona Virus : भारत गंभीर टप्प्यावर, आता हलगर्जीपणा नको; मुकेश अंबानींचं मोठं विधान

Corona | एकदा बरं झाल्यानंतरही पुन्हा संसर्गाची शक्यता, लस आल्यानंतरही संकट कायम राहील?

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल