Corona Virus : भारत गंभीर टप्प्यावर, आता हलगर्जीपणा नको; मुकेश अंबानींचं मोठं विधान

भारत कोरोनाच्या गंभीर टप्प्यावर, आता हलगर्जीपणा नको, मुकेश अंबानींचं विधान (corona virus mukesh ambani)

Corona Virus : भारत गंभीर टप्प्यावर, आता हलगर्जीपणा नको; मुकेश अंबानींचं मोठं विधान

नवी दिल्लीः कोरोना विषाणूविरोधातल्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे, असं विधान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी केले. (India Enters Crucial Phase In Fight Against Covid 19 Cant Let Guard Down Mukesh Ambani)

भारत कोरोनाच्या गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे, अशा प्रसंगी आता हलगर्जीपणा करता येणार नाही. सरकारने सुधारणांसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे आगामी काळात वेगाने आर्थिक पुनरुज्जीवन आणि वेगवान प्रगती साधता येणं शक्य होणार आहे. देशातील काही भागात कोरोनाची प्रकरण पुन्हा वाढू लागली आहेत, अशी माहिती अंबानींनी यावेळी दिली. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांवर निर्बंध घालावे लागले. उदाहरणार्थ, अहमदाबादमध्ये प्रशासनाने नाईट कर्फ्यू लागू केला आहे, तर दिल्लीसारख्या शहरात वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या अधिवेशनात मुकेश अंबानी बोलत होते. अंबानी म्हणाले, कोरोना साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईतील भारतानं महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. आपण या क्षणी हलगर्जीपणा करून चालणार नाही, ” असं अंबानींनी अधोरेखित केले आहे. भारत एक प्राचीन भूमी आहे आणि इतिहासातही भारतानं बर्‍याच प्रतिकूल परिस्थितींचा सामना केला आहे. पूर्वीच्या तुलनेत भारत बळकट झाला आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना अंबानी म्हणाले की, कोरोनानंतरच्या काळात भारतानं नेत्रदीपक सुधारणा केल्या आहेत. आर्थिक वाढीमुळे येत्या दोन दशकांत अभूतपूर्व संधी निर्माण होतील आणि भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असा विश्वासही मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे. (india enters crucial phase in fight against covid 19 cant let guard down mukesh ambani)

पर्यावरणाला हानी न पोहोचवता अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आपण ऊर्जा निर्माण करू शकतो की नाही हे जगासमोरचे मोठे आव्हान आहे. सध्या जगाला अधिक ऊर्जेची आवश्यकता आहे, या शतकाच्या मध्यभागी जगात दुप्पट ऊर्जा वापरली जाईल. येत्या दोन दशकांत भारताची दरडोई ऊर्जा गरज दुप्पट होईल. स्वच्छ व हरित ऊर्जा महासत्ता बनण्याबरोबरच आर्थिक महासत्ता होण्याचे दुहेरी उद्दिष्ट भारताने साध्य करणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले आहेत.

(India Enters Crucial Phase In Fight Against Covid 19 Cant Let Guard Down Mukesh Ambani)

संबंधित बातम्या

धोका वाढला! राज्यात 5760 कोरोनाबाधित सापडले, मुंबईत 1092 रुग्णांची नोंद

शाळांना कोरोनाचं ग्रहण, अमरावतीत 22 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *