AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियन महिलेनं असं काही केलं, ब्लॉगरला आली शंका, अन् भारताचं नाव…

दिल्लीमध्ये रशियातून आलेल्या महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे, मात्र त्यानंतर जे घडलं, त्यामुळे या महिलेला आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे, या महिलेकडून भारताचं कौतुक करण्यात आलं आहे.

रशियन महिलेनं असं काही केलं, ब्लॉगरला आली शंका, अन् भारताचं नाव...
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 1:13 PM
Share

दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकदा आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो, जे ठिकाण आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे, अशा ठिकाणी आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.  असा अनुभव अनेकांना आतापर्यंत आलाच असेल. अनेकदा परदेशी नागरिकांची देखील फसवणूक होते, मात्र जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं या परदेशी नागरिकांच्या लक्षात येतं, तेव्हा देशाचं नाव देखील खराब होतं, परदेशामध्ये आपल्या देशाबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते. असाच काहीसा प्रसंग एका विदेशी महिलेसोबत दिल्लीमध्ये घडला आहे. ही रशियन महिला दिल्लीमध्ये भारत दर्शनासाठी आली होती, तेव्हा एक धक्कादायक घटना घडली आहे.

ही महिला विमानतळावरून बाहेर आली, तेव्हा तिथे काही महिला बसल्या होत्या, त्या गरीब होत्या, त्या महिलांनी या रशियन महिलेकडे प्रत्येकी 50 रुपयांची मागणी केली, रशियन महिलेला देखील या महिलांची दया आली आणि तिने या महिलांना सोबत घेऊन एका दुकानात या महिलांसाठी काही खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. दुकानरदाराने या महिलेकडून 1400 रुपयांचं बिल घेतलं.

परंतु या महिलेच्या शेजारीच एक ब्लॉगर देखील होता, एवढ्याशा वस्तूंचं बिल 1400 रुपये कसं होऊ शकतं? असा संशय त्याला आता तो या महिलेला घेऊन पुन्हा त्या दुकानदाराकडे गेला, तेव्हा हे बिल प्रत्यक्षात 1400 रुपये नाही तर 1100 रुपये एवढंच झाल्याचं समोर आलं. दुकानदाराने या महिलेची फसवणूक केली होती, ब्लॉगरने दुकानदाराकडून हे पैसे घेऊन त्या महिलेला दिले. त्यानंतर या महिलेनं या ब्लॉगरचे आभार मानले तसेच “तुमच्यासारख्या लोकांमुळेच भारत इतका सुंदर वाटतो.” असंही ही महिला यावेळी म्हणाली. भूमी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा सर्व प्रसंग पोस्ट करण्यात आला आहे.

या ब्लागरला शंका आल्यामुळे या महिलेची फसवणूक टळली आहे. या महिलेनं या ब्लागरचे आभार मानत भारताचं कौतुक केलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...