AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याकडून चूक झाली…, गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यानंतर मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

माझ्याकडून चूक झाली..., गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Prithviraj ChavanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 5:15 PM
Share

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती,  परंतु आता त्यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

सोनिया गांधी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी तयार होत्या, परंतु मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही, तेवढी ताकद त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे होती का? असा प्रश्न यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘प्रश्न असा आहे की, संसदीय परंपरेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे पक्षाध्यक्ष ठरवतात, आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ठरवतात, त्यामध्ये माझी चूक झाली, असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत म्हणतात की जर आज गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर जिंवत असते? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की,  यावर मी फार काही बोलणार नाही, मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्या नेत्याला फार मोठं भवितव्य होतं असा नेता अचानक आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.’ ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा