AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉशिंग मशीनमध्ये अडकलीये घाण? साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स

वेळ वाचवण्यासाठी आज अनेक महिला मशीनचा वापर करतात. अशात जास्त दिवस मशीन वापरल्यानंतर त्यामध्ये घाण जमा होते. त्यामुळे घरात मशीन साफ करण्यासाठी जाणून काही खास टीप्स

वॉशिंग मशीनमध्ये अडकलीये घाण? साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स
Washing Machine
| Updated on: Aug 16, 2026 | 3:08 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात काम कशा प्रकारे पूर्ण करता येईल, याच प्रयत्नात महिला असतात, त्यासाठी अनेक उपकरणं देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाचं एक उपकरण म्हणजे वॉशिंग मशीन.. बहुतेक घरांमध्ये मळलेले कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण काही महिला आजही मशीनचा वापर करत नाहीत. वॉशिंग मशीन वापरल्याने केवळ मेहनतच नाही, तर बराच वेळही वाचतो. मात्र, बऱ्याच लोकांना मशीन स्वच्छ करणं हे एक अवघड काम वाटतं. जास्त दिवस वापर झाल्यानंतर, मशीनच्या आत पाणी आणि डिटर्जंटचे अवशेष जमा होतात.

याव्यतिरिक्त, जर मशीन बाल्कनीमध्ये ठेवली असेल, तर धूळ आणि घाणीमुळे ती लवकर खराब होऊ शकतं. तुमची वॉशिंग मशीन चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि तिला गंजण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही काही सोप्या जीवनशैली टिप्सचा अवलंब केला पाहिजे. या गोष्टी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्यास, तुम्हाला ते व्यवस्थित करण्यासाठी कोणाला, बोलावण्याची गरज भासणार नाही.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा याचा वापर तुम्ही करु शकता. वॉशिंग मशीनमध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी, प्रथम ड्रममध्ये दोन कप व्हिनेगर टाका आणि मशीन उच्च-तापमानाच्या सायकलवर चालवा. त्यानंतर, अर्धा कप बेकिंग सोडा टाका आणि सायकल पुन्हा चालवा. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मशीनमधून घाण, मळ आणि जीवाणू प्रभावीपणे काढून टाकतात.

गरम पाणी देखील महत्त्वाचं ठरेल. मशीन स्वच्छ करण्यासाठी, गरम पाण्यात थोडी क्लिनिंग पावडर टाका आणि मशीन त्याच्या सेल्फ-क्लीनिंग मोडवर चालवा. हायड्रोजन पेरॉक्साइडने देखील मशीन साफ करु शकता. हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिसळा, हे द्रावण एका मऊ टॉवेलवर लावा आणि त्याचा वापर करून मशीनच्या गॅस्केट आणि सांध्यांवरील घाण साफ करा. ही पद्धत ग्रीस, शेवाळ आणि सर्वसाधारण घाण काढून टाकण्यास मदत करते.

लिंबाचा रस देखील एक प्रभावी मार्ग आहे. तुमची वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस देखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. ही युक्ती वापरण्यासाठी, दोन लिंबांचा रस ड्रममध्ये टाका आणि सुती कापडाने ड्रम पुसून घ्या. लिंबामधील आम्लधर्मी गुणधर्म मशीनमध्ये साचलेली घाण स्वच्छ करतात आणि एक ताजेपणाचा सुगंध पसरवतात.

Follow Us
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट