AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये या अभिनेत्रीने घातला राडा, कपडे काढले अन् थेट…, नेमकं काय घडलं?

टीव्ही अभिनेत्री अंतरा बनर्जीने अरावली एक्सप्रेसमध्ये शिवीगाळ आणि कपडे काढले अन् राडा केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं?

ट्रेनमध्ये या अभिनेत्रीने घातला राडा, कपडे काढले अन् थेट..., नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 16, 2026 | 3:04 PM
Share

टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी विश्वात काम करणारी अभिनेत्री अंतरा बॅनर्जी हिला रेल्वेतील गोंधळाच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 31 वर्षीय अंतरा बॅनर्जीवर 12 ऑगस्ट रोजी अरावली एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये आरपीएफ जवानांसोबत वाद घालत मोठा गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ट्रेनमध्ये तब्बल तासभर गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं वृत्त आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंतरा शूटिंगच्या कामासाठी सुरतकडे जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचं तिकीट होतं, मात्र ती आरक्षित एसी कोचमध्ये गेल्याचा आरोप आहे. ज्या प्रवाशाची त्या सीटवर आरक्षणाची जागा होती, त्याने याबाबत टीटीकडे तक्रार केली. त्यानंतर अंतरा यांना जागा रिकामी करण्यास सांगण्यात आलं आणि वादाला सुरुवात झाली.

आरपीएफ जवानांशी वाद

बोरीवली आणि दहानू दरम्यान रात्री साडेनऊ ते रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशाने टीटीला बोलावून घेतल्यानंतर तिकीट कलेक्टर हरिकेश त्रिपाठी यांनी आरपीएफला माहिती दिली. त्यानंतर आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी अंतरा यांनी आरपीएफ जवानांसोबत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर त्या हिंसक झाल्या आणि त्यांनी कपडे काढल्याचंही पोलिसांच्या तक्रारीत नमूद असल्याचं वृत्त आहे. एवढंच नाही तर त्यांनी रेझरची ब्लेड हातात घेऊन अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीत अभिनेत्रीला देखील दुखापत झाल्याची माहिती आहे.

एसी कोचची काच फोडून पळण्याचा प्रयत्न?

गोंधळादरम्यान अंतरा यांनी ट्रेनच्या एसी कोचची काच फोडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. अखेर आरपीएफ जवानांनी त्यांना दहानू रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरवलं आणि पुढील कारवाईसाठी सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं.

या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या गणवेशाचं आणि मोबाईल फोनचं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली रेल्वे पोलिसांनी अंतरा बॅनर्जी यांना ताब्यात घेतलं.

स्वतःच्या अटकेची केली मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अंतरा यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची आणि कायदेशीर सल्ला घेण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार देत स्वतःला अटक करण्याची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून अभिनेत्रीविरोधात नोटीस बजावली आहे.

Follow Us
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...