AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंड मित्राच्या गाडी मध्ये दिसताच परमप्रीतने अशी कृती केली, त्यात त्याचाच जीव गेला, सगळीकडे या घटनेची चर्चा

प्रेम जितकं सुंदर असतं, तितकाच प्रेमात राग वाईट असतो. प्रेमात प्रियकर आणि प्रेयसी दोघांमध्ये परस्परांवर हक्क सांगण्याची एक भावना असते. पण त्याचा अतिरेक झाला की, एखाद्या चांगल्या नात्याचा शेवट व्हायला वेळ लागत नाही. इथे सुद्धा असचं घडलं.

गर्लफ्रेंड मित्राच्या गाडी मध्ये दिसताच परमप्रीतने अशी कृती केली, त्यात त्याचाच जीव गेला, सगळीकडे या घटनेची चर्चा
Boyfriend-Girlfriend
| Updated on: Aug 16, 2026 | 3:56 PM
Share

प्रेम कितीही जुनं असलं तरी त्यात एकदा संशयाचा किडा घुसला की, एखाद्या चांगल्या नात्याची वाट लागायला वेळ लागत नाही. छत्तीसगडमधील रायपूरचं हे प्रकरण आहे. दोघांच्या नात्याला 3-4 वर्ष झाली होती. दोघांची कुटुंब लग्नासाठी देखील तयार होती. पण एक दिवस एक भेट, संशय आणि एकावादाने सगळं काही बदलून टाकलं. रायपूरमध्ये एक युवक आपल्या गर्लफ्रेंडला रोखण्यासाठी कारच्या बोनेटवर चढला. कार निघाल्यानंतर जवळपास 200 मीटर अंतरापर्यंत तो युवक कारच्या बोनेटवरच उभा होता. पण अचानक तो बोनेटवरुन खाली रस्त्यावर पडला. कार त्याच्या अंगावरुन गेली. यात युवकाचा मृत्यू झाला. आरोपी फरार आहे. रायपूरची ही घटना आहे. परमप्रीत सिंह अशी मृताची ओळख आहे. टाटीबंधच्या उदया सोसायटीमध्ये तो राहत होता. व्यावसायिक होता. परमप्रीतने गर्लफ्रेंडला तिच्या मित्रासोबत बघितलं. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाला.

परमप्रीत त्या युवतीला 3-4 वर्षांपासून ओळखत होता. कुटुंबात लग्नाची बोलणी सुरु होती. अशावेळी गर्लफ्रेंडचं दुसऱ्या युवकासोबत कारमधून जाणं परमप्रीतला नाही पटलं. दोघांमध्ये बरीच शाब्दीक बाचबाची झाली. आधी परमप्रीतच्या गाडीत दोघांमध्ये वादविवाद झाला. युवती परमप्रीतच्या गाडीतून उतरली, भरतच्या गाडीत जाऊन बसली. परमप्रीतने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. विषय इतका वाढला की, परमप्रीतने भरतच्या कारला धडक दिली.

त्यानंतर जे घडलं त्यामुळे संशय

त्यानंतर भरत कार स्टार्ट करुन पुढे घेऊन जात होता. परमप्रीतने मागे हटायला नकार देत कारच्या बोनेटवर चढला. त्याला वाटलं की, कार थांबवतील. पण कार थांबली नाही. परमप्रीत बोनेटवर उभा असताना कार 200 मीटर अंतरापर्यंत पळाली. अचानक तोल सावरता न आल्याने तो खाली पडली. पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे अपघाताव्यतिरिक्त संशय मनात निर्माण होतो.

सीसीटीव्ही फुटेज तपासलं

परमप्रीत खाली कोसळल्यानंतर कार त्याच्या अंगावरुन नेली असं पोलिसांचं म्हणणं आहे. परमप्रीतच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आमानाका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. CCTV फुटेज आणि प्राथमिक चौकशीतून जे दिसतय त्यावरुन प्रथमदर्शनी ही हत्या वाटत आहे. याच आधारावर गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन