AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री? त्या एका निवदेनाने मोठी खळबळ, थेट…काय आहे प्रकरण?

Tukaram Mundhe Shani Shingnapur: देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये लवकरच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढें यांचे FDA पथक धडक देऊ शकते. अन्न आणि औषध प्रशासनाकडे मोठी तक्रार आली आहे. अन्न आणि भेसळीला लगाम घालण्यासाठी धाडी टाकण्यात येत असताना आता भाविकांना त्यांच्याकडून मोठी आशा लागली आहे. काय आहे हे प्रकरण?

आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री? त्या एका निवदेनाने मोठी खळबळ, थेट...काय आहे प्रकरण?
तुकाराम मुंढे, शनि शिंगणापूरImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 16, 2026 | 3:10 PM
Share

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि चौथऱ्यावर शनिमूर्तीवर वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भेसळयुक्त तेलाचा संशय व्यक्त करत याप्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. शेगावमधील श्री गजानन महाराज मंदिराशेजारील पेढ्यापासून ते अनेक नामांकित हॉटेल्सवर तडक कारवाई करण्यात आलेली आहे. हायकोर्ट कॅटिन पासून ते मंत्रालयातील कँटिन चालकांचे धाबे त्यांनी दणाणून सोडले आहे. आता शनिशिंगणापूर येथील भेसळयुक्त तेलाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. अगोदर संस्थेने एक निवेदन देवस्थान ट्रस्ट कार्यालयाला दिले आहे.

मोठ्या रॅकेटचा संशय

या भेसळयुक्त तेलप्रकरणी मोठे रॅकेट असण्याचा दावा करण्यात येत आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन निकृष्ट अथवा बनावट तेलाची विक्री करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा विक्रेत्यांची दुकानदारी बंद करून भाविकांची फसवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. शनि शिंगणापूर येथे अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहित हाती घ्यावी. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष नमुने तपासणीसाठी घ्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. शनि मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या तेलाची गुणवत्ता तपासणीसाठी यापूर्वीच देवस्थानने अन्न आणि औषध प्रशासनाला आवाहन केल्याचेही समोर येत आहे. तेलाची तपासणी करण्यासाठी साद घातली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाची धास्ती

अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा धडका लावला असून भेसळयुक्त पदार्थांवर जप्ती आणि बंदी घातली जात आहे. शालेय पोषण आहार असेल किंवा हॉटेलमधील पनीर असेल, तुकाराम मुंढेंच्या कारवाईने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या दुधालाही दर आणि सन्मान मिळू लागला आहे. कारण, दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणात बंद झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, सर्वच स्तरांतून एफडीएकडे तक्रारींचा ओघ वाढला असून आता चक्क शनि मंदिर प्रशासनानेही एफडीएकडे भेसळयुक्त तेलाच्या चौकशीची मागणी केली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरातील आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. मोठ्या ब्रँडकडे या खात्याने मोर्चा वळवला आहे. तपासणीत अनेक मोठ्या ब्रँडमधील अस्वच्छता, अन्न सुरक्षा आणि स्वच्छेतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने डॉमिनोज पिझ्झापासून अनेक मोठ्या आस्थापनांना दणका देण्यात आला आहे. इतकेच नाही तर राज्यातील आयुर्वेदिक औषधं उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहिमही त्यांनी हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी उत्पादनात त्रुटी आढळल्याने, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्याने अशा उत्पादक कंपन्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध अमरप्रीत या हॉटेललाही मुंढे यांच्या विभागाने दणका दिला आहे. दूध भेसळ, पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीविरोधात कारवाईचे हत्यार उपसल्यानंतर राज्यात बोगस दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना