AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Jagtap Case : उच्चशिक्षित बायको एका सवयीला वैतागली, नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट; पोलीस चौकशीत केला हादरवणारा खुलासा

बारामतीत हादरवणारी घटना घडली आहे. बारामतीत पत्नीने नवऱ्याला जिवंत गाडण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pravin Jagtap Case : उच्चशिक्षित बायको एका सवयीला वैतागली, नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट; पोलीस चौकशीत केला हादरवणारा खुलासा
pravin jagtap case Image Credit source: tv9
| Updated on: Aug 14, 2026 | 8:23 AM
Share

पुण्याच्या बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासमारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पत्नीने पोलीस चौकशीत हादरणारा खुलासा केला आहे. पती रोज मारहाण करायचा. मला नोकरी करू द्यायचा नाही, असा आरोप पत्नीने केलाय. पत्नीने पोलीस चौकशीत आणखी काही हादरवणारे खुलासे केले आहेत.

शर्मिला जगताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिने म्हटलं की, ‘नवऱ्याने माझी अवस्था एका मोलकरणीसारखी केली होती. बी फार्मसीचे शिक्षण घेऊनही नोकरी करायला बाहेर जाऊ देत नव्हता. कायम मारहाण करत राहायचा. पतीच्या वागण्याने नैराश्यात गेले होते. मुलांनाही सारखी मारहाण करायचा. घरात मोलकरणीसारखं बनवून ठेवलं होतं, असा आरोप शर्मिलाने केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

बारामतीत उच्चभ्रू वस्तीमधील एका फ्लॅटमध्ये प्रवीण जगताप आणि त्याची पत्नी शर्मिला राहत होते. त्यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. त्यामुळे शर्मिलाने प्रवीणला जमिनीत पुरण्याचा कट रचला. फ्लॅटच्या बाल्कनीत बगीचा तयार करायचा होता. तिने बाल्कनीत एक कट्टा बनवला होता. घरात एक औषध पाजून नवऱ्यााल बेशुद्ध केलं. त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीणचा मृत्यू झाल्याचा समजून त्याला जिवंत पुरण्याचा प्रयत्न सुरू केला. शर्मिलाने नवऱ्याला चौकोनी कट्ट्यात ठेवले. त्यानंतर त्यावर माती टाकली.

मजुराने बोलावलं अन्…

काही वेळाने एका मजुराला बोलावून पत्नीने कट्ट्यावर टाइल्स लावण्याचा प्रयत्न केला. परंतु मजुराला संशय आल्याने त्याने तातडीने या घटनेची माहिती बारामती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटस्थळी धाव घेतली. या कट्ट्यातून बेशुद्ध पतीला बाहेर काढलं. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून आरोपी महिलेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्