Maharashtra News LIVE : मुंबई – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Maharashtra News LIVE Updates : राज्यातील रस्त्यावरील खड्डे , वाढत्या अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर चाकणमधील कंपन्या बंद पडणार असून त्याचाही मुद्दा ऐरणीवर आलाय.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक वळविण्याने येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यातच आज रविवार असल्याने परतीच्या वाहनांनामुळे ट्रॅफीक जाम होत आहे.
-
हायकोर्ट लिपिक परीक्षा गोंधळ – विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ जिल्हा सत्र न्यायाधीशांसोबत चर्चेसाठी एक्झाम सेंटरमध्ये
पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ जिल्हा सत्र न्यायाधीशांसोबत चर्चेसाठी एक्झाम सेंटरमध्ये गेले आहे. त्यामुळे हायकोर्ट लिपिक परीक्षेवरुन विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलन विद्यार्थी मागे घेणार का ? त्यांना प्रशासन काय आश्वासन देणार याकडे लक्ष लागले आहे.
-
-
बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी, नांदेडमध्ये विद्यार्थी आक्रमक
बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी, नांदेडमध्ये विद्यार्थी आक्रमक
नांदेड शहरातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ परीक्षा केंद्रावर परीक्षेचं आयोजन
ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सोयी सुविधाचा अभाव असल्याचा आरोप
परीक्षेच सॉफ्टवेअर स्लो आहे, कीबोर्ड नादुरुस्त होते, जुने संगणक होते,स्क्रिन साईज छोटी होत्या असा विद्यार्थ्यांचा आरोप
परीक्षा परत आयोजित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक
-
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी
नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे ड्रोन दृश्य समोर
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी
नाशिक त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढल्याने त्रंबकेश्वर रस्ता जाम
तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची देखील कामे सुरू, त्यामुळे कोंडी वाढली
-
हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, अभिजीत दिपकेंनी घेतली आंदोलकांची भेट
हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून, विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अभिजीत दिपके यांनी या आंदोलकांची भेट घेतली आहे.
-
-
महिला शेतकरी धोरण आणणार महाराष्ट्र पहिलं राज्य-दत्तात्रय भरणे
दादांच्या इच्छेप्रमाणे उद्योगिनी अँप बनवले याबद्दल पार्थ पवार आणि जय पवार यांचे आभार मानतो. महिलांचे स्थान हे आपल्या जीवनात महत्वाच आहे. दादांनी लाडकी बहीण योजना सुरु केली त्यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. बचत गट चांगल्या पद्धतीने कसे करिता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्य सरकार देखील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रगती पथावर काम करीत आहे. ज्या घरात तिजोरीची चावी महिलाकडे असते ते घर अधिक सुरक्षित असते. घरात राबणाऱ्या महिलेच्या नावावर सातबारा नाही. महिला शेतकरी धोरण आणणार महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे, असे मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
-
वाराणसीत शिंदे सेनेच्या नेत्या पिस्तूलातून मिस फायर
वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) नेते व मुंबईचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून अपघाती गोळी सुटली. ज्यामुळे विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले. आज १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी, बाबतपुर (वाराणसी) विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत ही घटना घडली कमलेश राय हे पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने (IX-1810) मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते नियमानुसार पिस्तूल सील करून पायलटच्या केबिनमध्ये ठेवण्यापूर्वी त्याची मॅगजीन वेगळी करताना ट्रिगर दाबल्या गेल्याने अपघाताने एक राउंड फायर झाला. या अपघाती गोळीबारामुळे विमानतळावर सुरक्षेची तपासणी करणारी महिला कर्मचारी सुमन यांच्या पायाला थेट गोळी लागली, तर पुरुष कर्मचारी रोहित यांच्या हाताला/पायाला गोळीचे छर्रे लागून ते जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी कमलेश राय यांना ताब्यात घेतले असून स्थानिक पोलिसांमार्फत पुढील कायदेशीर कारवाई व चौकशी सुरू आहे.
-
-
जज साहेब खाली या, उत्तर द्या.
मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग आणि स्टेनोच्या पेपर मध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत आहे. त्यांनी जज साहेब खाली या, उत्तर द्या अशी घोषणाबाजी सुरू केली आहे. परीक्षा देताना सर्व्हर मध्ये बिघाड अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन सुद्धा झाले नाही. सरावासाठी दिलेले कीबोर्ड यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होते त्यामुळे व्यवस्थित सराव सुद्धा होऊ शकला नाही व वेळ निघून गेला. दहा वाजता एक्साम सेंटरच्या आत गेलेले विद्यार्थी तीन वाजेपर्यंत बाहेर आले नाही त्यामुळे सेकंड बॅचचे विद्यार्थी हे सेंटर बाहेरच उभे राहिले. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही सूचना न देता शेवटच्या क्षणी परीक्षा ही स्क्रीन टू स्क्रीन होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली
-
मनोज जरांगेंचा 20 तारखेपासून मराठवाडा दौरा
अंतरवालीतील बैठक संपवून मनोज जरांगे पाटील पुन्हा छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना झाले. पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार होणार आहेत. 20 तारखेपासून मराठवाडा दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.
-
आदिती तटकरेंची मोठी माहिती
दादांच्या आग्रहाखातर 19 ऑगस्ट 2024 साली लाडकी बहीण कार्यक्रम याच ठिकाणी झाला. पार्थ पवार आणि जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अँप बनविण्यात आले आहे. महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी अँपची मदत राहणार आहे. हे अँप अतिशय सोप्या पद्धतीने बनविण्यात आले आले. या अँप मुळे राज्यात महिला उद्योजक होण्यासाठी मदत होणार आहे. पहिलं महिला शेतकरी विधेयक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आणलं याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. दादांच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे कि अँप वापरून उद्योजक व्हावं, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
-
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सवना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सवना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गोंधळ झाला. गोंधळानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला. अपहार केल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामसभेत आरोप करण्यात आला. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वाद वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला. स्वातंत्र्यदिनी हिमायत नगरच्या सवना येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
-
नालासोपारा केक विषबाधा प्रकरणात तपासणी
नालासोपारा केक विषबाधा प्रकरणात FDA च्या दोन अधिकारी यांनी श्री चामुंडा केक शॉप वर जावून त्याची तपासणी केली आहे. या शॉप मधील एका फ्रिज मध्ये ठेवलेले केक ही एफडीए अधिकारी यांना मिळाले असून, त्या केक चे शॅम्पल तपासणीसाठी घेतले आहेत. काल १५ ऑगस्ट रोजी चामुंडा केक शॉप मधून घेतलेल्या केक मध्ये मृत पाल चे तुकडे आढळल्याने ११ जनाना विषबाधा झाली आहे. सध्या आम्ही याची सर्व तपासणी करून केक चे शॅम्पल घेवून तपासणी साठी पाठवणार आहोत. त्याच्या अहवाला नंतर पुढील कारवाही करणार असे FDA अधिकारी यांनी सांगितले आहे
-
नागपंचमीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून नागपूजन, फेर-भुलई यांसह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात. याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
-
कांदिवलीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
कांदिवलीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू झाले आहे. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ चा अनादर झाल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ता आंदोलन करत आहेत.
-
वांगणी आणि अंबरनाथमधून एमडी ड्रग्ज जप्त
वांगणी आणि अंबरनाथमधून एमडी ड्रग्ज जप्त. बदलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी. अंबरनाथ पश्चिम पोलिसांचा ड्रग्ज माफीयांना आशीर्वाद?
-
सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडी आक्रमक
सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडी आक्रमक. सोलापूर शहरातील बीओटी तत्वावर दिल्या जाणाऱ्या कामाला महाविकास आघाडीचा विरोध. सोलापूरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. सोलापूर मनपाच्या 7 जागा बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांचा विरोध. शहरातील आरक्षित असणाऱ्या जागा बीओटीवर देण्याला महाविकास आघाडीचा कडाडून विरोध. याबाबत उद्या महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून पुढील दिशा ठरवणार असल्याचेही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले.
-
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ समोर. कालपासून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. आज त्र्यंबकेश्वरमध्ये खाजगी वाहनांना बंदी, तरीही भाविकांची गर्दी कायम.
-
चाकण MIDCमध्ये मंत्री येणार म्हणून डागडुजीची लगबग; कायमस्वरूपी उपाययोजना कधी? नागरिकांचा सवाल
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आज उद्योगमंत्री उदय सामंत पाहणी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मंत्री येण्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या साइड पट्ट्यांची डागडुजी करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, ही डागडुजी केवळ मंत्री येणार म्हणून केली जात आहे का, असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण चाकण MIDCमध्ये केवळ रस्त्यांचीच नव्हे, तर वाहतूक कोंडी, अपघात, कचरा आणि इतर पायाभूत सुविधांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत.
-
“‘कर भरतोय मग खड्डे का?’; डोंबिवलीत ह प्रभागावर नागरिकांचा धडक मोर्चा, ४८ तासांचा अल्टिमेटम
डोंबिवली पश्चिमेतील ‘गरीबाचा वाडा’ परिसरातील खड्ड्यांविरोधात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी H प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. ‘माती नको, पक्का काँक्रिट रस्ता द्या’ अशी मागणी करण्यात आली असून रिक्षाचालकांनीही परिसरात येण्यास नकार दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ‘आमचे टॅक्स वेळेवर, मग खड्डे का?’ म्हणत प्रभाग अधिकाऱ्यांना स्थानिकांनी घेराव घातला आहे. तसंच ४८ तासांत काम न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
-
धाराशिवमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट; कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्ज सेवनाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. तुळजापूर, परांडा आणि आता कळंबमध्येही पोलिसांनी ड्रग्जविरोधात कारवाई केली आहे. मात्र, कारवाया सुरू असतानाही जिल्ह्यात ड्रग्जचा सुळसुळाट थांबताना दिसत नाही. विशेष म्हणजे, या कारवायांवरून आता जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. तुळजापूरनंतर कळंबच्या प्रकरणात राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींची नावं समोर आल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये चालकाने स्वतःच चारचाकी गाडी दिली पेटवून
छत्रपती संभाजीनगरमध्ये चालकाने स्वतःच चारचाकी गाडी पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. महानगरपालिकेने गाडीला जॅमर लावल्याने गाडी पेटवून दिल्याचं कळतंय. जॅमर काढण्याची विनंती करूनही जॅमर न काढल्याने चालकाने संतापाच्या भरात गाडी पेटवली. छत्रपती संभाजीनगर – जालना रस्त्यावरील जिल्हा कोर्टासमोर हा प्रकार घडला आहे.
-
हडपसर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं आंदोलन; चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
हडपसर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांचं चौथ्या दिवशीही उपोषण सुरू आहे. आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, ११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ लागू करावी आणि संबंधित GR जैसे थे ठेवावा, २००६ साली मंजूर झालेल्या ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी तत्काळ इमारत उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषण सुरू आहे.
-
आरक्षण अभ्यासकांसोबत मनोज जरांगे यांची बैठक
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनोज जरांगे तात्पुरता डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व आहे.
-
ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पाटील यांनी महापौरांना पत्र लिहून मुंबईकरांच्या आरोग्याचा महत्वाचा मुद्दा मांडला
पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, सणांच्या काळात बाजार, मॉल आणि दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या चणे-फुटाण्याच्या प्रसादाला ‘ओरामाईन’ नावाच्या रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगात वापरले जाते. त्यामुळे कॅन्सर, किडनी आणि हृदयविकारासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे महानगरपालिकेने अशा रसायनयुक्त प्रसादाची तातडीने तपासणी करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वातील मोर्चाची तयारी सुरू
नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वातील मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयात स्वतः नगरसेवकांकडून बनवले झेंडे जात आहेत. कार्यकर्त्यांसोबत बसून मोर्चाची तयारी केली जात आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची बैठक, आरक्षण अभ्यासकांसह मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याच्या घोषणेची शक्यता
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची बैठक, आरक्षण अभ्यासकांसह मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याच्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकृती बिघडल्याने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे पाटलांवर उपचार सुरू असुन ते अंतरवालीकडे निघालेले आहेत, बैठकीनंतर पुन्हा उपचारासाठी परत जाणार आहेत. अंतरवालीत दाखल झाल्यानंतर आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक घेतील. सरकारने काढलेल्या जीआर आणि विविध योजनांच्या बाबतीतली माहिती,आढावा घेणार. यानंतर मराठवाडा किंवा विदर्भ दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
-
सिद्धिविनायक मंदीर परिसरात स्थानिक नागरीक आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी…
सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभिकरणासाठी सिद्धिविनायक मंदीराचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. याला विरोध म्हणून हे स्थानिक नागरिक आणि ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. सिद्धिविनायक मंदीराचे सुशोभीकरण मुंबई महानगर पालिकेकडून केलं जात आहे.
-
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ऑन जळगाव दौरा
हा संघटनात्मक दौरा आहे मला भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर माझ्या दौऱ्याला उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केली. ठिकठिकाणी पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठकीतून संवाद साधणार आहे. पुढच्या काळामध्ये भाजप महिला मोर्चाची रणनीती कशी असावी या संदर्भात आम्ही सत्ताधारी पक्ष असल्याने हा दौरा आहे. या दौऱ्यांमध्ये महिलांबरोबरच आमच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या देखील सूचना समजून घेणार आहोत. महिला शेतकरी म्हणून काम करत होती जमीन कसं होते मात्र तिला शेतकरी म्हणून दर्जा नव्हता.. तो देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाला आहे. या योजनेबद्दल महिलांना काय वाटतं ते देखील आम्ही जाणून घेणार आहोत. यादरम्यान अंगणवाडी आशा सेविका असतील तसेच महिला बचत गटाच्या महिला असतील उद्योजक महिला असतील त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत.
-
मुंबईच्या ऑटो रिक्षा चालकांना ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा
ऑटो रिक्षा चालक असो कामगार असो किंवा इतर संघटनेचे लोक असो शिवसेनेसोबत जोडलेले आहेत. मराठी शिकवण्यासाठी ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने कार्यशाळा सुरू केल्या होत्या आणि उत्तर भारतीय बांधवांनाही मानसिकता दाखवली होती. जसा आपण या गोष्टीवर फोकस केले तसंच शिक्षण रस्ते खड्डे त्यालाही यांनी प्राधान्य द्या. असं वक्तव्य नगरसेवक सचिन पाटिल यांनी केलं आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते, मराठा आंदोलक योगेश केदार अंतरवालीकडे रवाना
लक्ष्मण हाकेंची भेट झाली होती तर ओबीसी आरक्षणातला आमचा वाटा कसा आहे हे मी त्यांना समजावून सांगत होतो. मनोज जरांगे पाटील आणि काही लोकांचा गैरसमज झाला त्यामुळे सोशल मीडियावर तो वाद निर्माण झाला होता. आज मनोज जरांगे पाटलांनी आणि काही लोकांनी अभ्यासकांना निमंत्रण दिलेले आहे त्यामुळे मी बैठकीसाठी जात आहे. एवढी मोठी आणि महत्त्वाची समाजाच्या हितासाठी बैठक होत असताना मी घरी बसणं हे काही योग्य होणार नाही… असं वक्तव्य योगेश केदार यांनी केलं आहे.
-
आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर वीरेंद्रसिंह बिसोया याला पुणे विशेष न्यायालयात हजर
आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर वीरेंद्रसिंह बिसोया याला पुणे विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार. 13000 कोटी रुपयांची ड्रग्स तस्करी प्रकरणी भारतात आणण्यात आलं होत. पटियाला न्यायालयाने ट्रांसलेट रिमांड देऊन पुण्यातील विशेष एनसीबी न्यायालयाला ताबा दिला होता. पुणे पोलिसांनी 2024 ला दिल्लीत एका ड्रग्स प्रकरणी कारवाई केली होती या प्रकरणात त्याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून कोर्टाच्या बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला असून थोड्या वेळात पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार
-
भावेश कावरे थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला
प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून वादात सापडलेला भावेश कावरे थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट घेणार आहे.
-
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांना वंदे मातरम संदर्भातलं पुस्तक पाठवलं
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांना वंदे मातरम संदर्भातलं पुस्तक पाठवल. चित्रा वाघ आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव मधून त्यांनी सोनिया गांधी यांच्या पत्त्यावर पोस्टाने माध्यमातून पुस्तक पाठवले. चित्रा वाघ यांनी आमदार सुरेश भोळे यांचा निवासस्थानावरून लिफाफ्यावर सोनिया गांधी यांचा दिल्लीचा पत्ता स्वतःच्या हाताने लिहत ते पोस्टमनच्या सुपूर्द केला आहे. वंदे मातरम् सुरू असताना सोनिया गांधी यांनी जे केलं ते देशाचा अपमान आहे, गीताचा अपमान आहे. फक्त गांधी नाव असल्याने देशप्रेम नसतं.. ते तुमच्या लगता रक्तात असावा लागतो त्यामुळेच मी सोनिया गांधीजींना पुस्तक पाठवलं असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या की आपल्या लेकाला देखील हे पुस्तक वाचायला द्या आणि वंदे मातरम गीताच्या मागची देश भावना समजून घ्या. असा सल्ला चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे.
-
CJP चे अभिजीत दिपके आज सायंकाळी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार
CJP चे अभिजीत दिपके आज सायंकाळी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत अभ्यासकांची बैठक संपून पुन्हा रुग्णालयात दाखल होणार. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपके गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भेट घेणार. मनोज जरांगे पाटील यांनी CJP च्या आंदोलनाला दिल्लीत जाऊन दिला होता पाठिंबा
-
भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले ; विकेंडला भंडारदरा परिसर पर्यटकांनी फुलला
भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले ; विकेंडला भंडारदरा परिसर पर्यटकांनी फुलला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाची संततधार. रंधा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. परिसरातील छोटे-मोठे धबधबेही प्रवाहित. पर्यटक पावसात भिजण्यासोबत बोटिंगचा घेतायत आनंद. कुटुंबीयांसह पर्यटकांची मोठी गर्दी.. पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी ; पोलिसांकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त. वाकी मार्गे एकेरी वाहतूक सुरू – वाहतूक नियमनात पोलिसांकडून बदल नियमांचे पालन करून पर्यटनाचा आनंद घ्या; पोलिसांचे आवाहन.
-
अखेर उद्योगमंत्र्यांची चाकण MIDC पाहणी; उद्योजकांच्या पाठपुराव्याला यश
चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लघु उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत उद्योगमंत्री आता केवळ बैठक न घेता MIDC तील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून बैठकीला हजेरी लावणार आहेत. लघु उद्योजकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसतंय.
-
हे मुंब्रा नाही मुंब्रा देवी- नितेश राणे
मंत्री नितेश राणे स्पीच बोलता बोलता आलोना मुंब्र्यात, सगळ्यांना वाटत होत मी इथे येऊ नये ते विसरले हे मुंब्रा नाही मुंब्रा देवी आहे. आज पासून सर्वांनी मुंब्रा देवी म्हणावं. हे हिंदू राष्ट्रात आहे, कुठल्या अब्बाच्या पाकिस्तान मध्ये नाही. मी तुम्हाला ताकद द्यायला आलोय. ही महादेवची भूमी आहे. इथे कोणाला घाबरून राहू नका हा संदेश मी मुख्यमंत्री यांच्याकडून तुम्हाला द्यायला आलोय. इथे हिंदुत्ववादी फौजच सरकार आहे. आपल्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही एवढी ताकद आपल्यात आहे. मुंब्रा देवीत हिंदूंची ताकद वाढली पाहिजे. मुंब्रा देवी काल पण भगवा होता आणि यापुढे पण भगवाच राहील
-
नालासोपाराच्या चामुंडा केक शॉप मधील केक खाल्याने 11 लोकांना विषबाधा
नालासोपारा च्या श्री चामुंडा केक शॉप मधील केक खाल्याने 11 लोकांना विषबाधा झाली आहे. नालासोपारा पूर्व जिजाई नगर मध्ये श्री चामुंडा केक शॉप आणि श्री चामुंडा डेअरी आणि आईस्क्रीम चे दुकान आहे काल 5 वाजता याच केक शॉप मधून वाढदिवसाचा केक नेला आसता त्यात चिटकलेली पाल आढळली असल्याचा आरोप पीडित मुलांनी केला आहे. सध्या केक शॉप पोलिसांनी बंद केले असून त्याला कुलूप मारले आहे.दुकानदार बाळुराम भाई याचे हे केक शॉप असून, त्याच शॉप मध्ये केक बनविला असल्याचे सागितले आहे. केक ला पालीचा तुकडा आढळा असल्याचे ही समोर आले आहे. चामुंडा केक शॉप समोरून आढावा घेवून, दुकानदार शी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी
-
श्रावण महिन्यातील पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी
श्रावण महिन्यातील धार्मिक उत्साह आणि स्वातंत्र्य दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले असून, दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे मंदिरापासून दर्शनाची रांग जवळपास चार किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागेचे वाळवंट भाविकांनी फुलून गेले असून, दर्शनासोबतच चंद्रभागा स्नान आणि प्रदक्षिणेसाठीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
-
पिंपळगाव येथील तरुणांची धोकादायक रॅपलिंग व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र याच वेगवान पाण्यात पर्यटक तरुणांकडून धोकादायक रॅपलिंग आणि स्टंटबाजी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
-
माळशेज घाटात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा मनस्ताप
माळशेज घाटात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. विकेंड आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे घाटात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, घाटातील बोगद्याजवळच एक एसटी बस अचानक बंद पडली. तब्बल एक तास ही बस रस्त्यातच उभी राहिल्याने कल्याण-नगर महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. घाट मार्गावर वारंवार नादुरुस्त होणाऱ्या एसटी गाड्यांमुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असून, परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून बसेसची नियमित तपासणी व देखभाल करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही नंदूरबारमधील माणिबेली अंधारात
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली. देश विकासाच्या नव्या पर्वात पोहोचला, मात्र नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव आजही अंधारातच आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावात आजही वीज पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे माणिबेलीपासून हाकेच्या अंतरावर गुजरातमध्ये विजेचा लखलखाट पाहायला मिळतो.
-
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचं टेलीप्रॉम्पटर बंद झालं-संजय राऊत
भाजपच्या लोकांना यामुळेच इडियट म्हटलं जातं. इडियट का म्हणतात, हे तुम्ही पाहत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचं टेलीप्रॉम्पटर बंद झालं. त्यावेळी वाचता येत नव्हतं. माझ्याकडे पूर्ण क्लिप आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यावर पंतप्रधान हे राष्ट्राला उद्देशून स्वातंत्र्यदिनी भाषण करत होते. लटपटले, घाम फुटला. त्यांच्याविषयी काय बोलाल. एका मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे विचारावं लागतं असे खासदार संजय राऊत म्हणाले.
-
उपचार घेऊन घरी परतत असताना खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका अडकली
आश्रम शाळेतील दिपाली मडावीची प्रकृती खराब झाल्याने नागपूर येथे हेलिकॉप्टरने नेऊन उपचार देण्यात आले होते. त्यानंतर काल नागपूर मेडिकल कॉलेजमधून तिला परत गडचिरोली जिल्ह्यात तिच्यासह गावी मुरूम गाव इथे सोडत असताना रस्त्यात मोठमोठे खड्डे व वृक्ष पडल्यामुळे रुग्णवाहिका अडकली. रुग्णवाहिकेला आरोग्य विभागाचे पथक व काही समाजसेवा त्यांनी ॲम्बुलन्सला धक्का देत बाहेर काढण्यात आलं.
-
सरकारने जाणीवपूर्वक त्रास दिलाय- मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजी नगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आज अंतरवाली सराटी येथे मराठा अभ्यासकांची बैठक आहे. मी आजारी असताना तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भ दौरा होणार. सरकारने जाणीवपूर्वक त्रास दिलाय, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी. सरकारने जो अन्याय सुरू केला आहे त्यासाठी जी किंमत नोजावी लागेल ती मोजायची.
-
बावनकुळे आणि शिरसाठ यांनी जातीय तेढ निर्माण केले- जरांगे पाटील
विदर्भात आम्ही कुणबी आहे तरी तुमच्या मदतीला येणार आहे. बावनकुळे आणि शिरसाठ यांनी जातीय तेढ निर्माण केला आहे. त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय केला तो मोडून काढावा लागेल असे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
स्वातंत्र्यानंतरही नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव अंधारातच
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव अंधारातच असल्याचे समोर आलं आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख असलेल्या गावात आजही वीज पोहोचलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास ४०० पाडे आजही वीजेपासून वंचित असल्याचा प्रशासनाची माहिती आहे.
-
मुंब्र्यातील कावड यात्रेला नितेश राणे यांची हजेरी
मुंब्र्यातील कावड यात्रेला नितेश राणे यांची हजेरी लावली आहे. त्यांच्या हस्ते मंदिरात पूजा सुरू झाली आहे. भगव्या पोशाखात त्यांनी मंदिराज हजेरी लावली आहे.
-
nagpur : रीलच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्यांना पोलिसांचा दणका
रीलच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्यांना रिल्सस्टारला नागपूर पोलिसांचा दणका दिला आहे. नागपूरच्या रेडियन हॉटेल चौकातील सिग्नल लागले असतांना….रस्त्याच्या मधोमध उभं राहून रील बनवणाऱ्या युवक-युवतीला पोलिसांनी चांगलीच समज दिली. धोकादायक पद्धतीने रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बोलावून रस्त्यावर स्टंटबाजी आणि प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणं टाळण्याचा इशारा दिला.
-
गेवराई गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामसभा घेण्याचे आदेश
बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा होत नसल्याची तक्रार गट विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश काढत ग्रामसभा घेण्याचे ग्रामसेविक गिता साळुंखे यांना कळवले तर विस्तार अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल घेऊन सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचे पत्र ग्रामस्थांनी ग्रामसेविका साळुंखे यांना दाखवले यावर त्यांना नॉलेज नाही म्हणत आदेश झिटकारुन लावल्याचा आरोप होत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
नागपुरात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
नागपुरात पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर झोल असं आत्महत्या केलेल्या साह्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ते नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातील पीआरओ आणि अर्ज शाखेत कार्यरत होते. पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख, चर्चांना उधाण
नाशिकमधील सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे. या फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवर उल्लेख आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
-
Dharashiv : धाराशिवच्या ड्रग्ज रॅकेटचे पुणे कनेक्शन उघड
धाराशिवच्या कळंबच्या एमडी ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. धाराशिव जिल्यातील कळंब ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढली. या प्रकरणी एमडी ड्रग्ज प्रकरणात चौथा आरोपी अटकेत आला आहे. कळंब शहरातील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास आता मावळपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील वडगाव येथील अक्षय रिटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात खड्ड्यांच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून उद्या रस्त्यावरील खड्ड्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी पाहायला मिळात आहे. बॅनरबाजीतून गरिकांना मोर्चासाठी आवाहन करण्यात येत आहे. ठाकरेंच्या युवा सेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा नाशिकमध्ये जोरदार चर्चा होत आहे. त्यात पुण्यातील चाकणमधून 20 कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाणार आहेत. या कंपन्यांमुळे अनेकाचे रोजगार बुडणार आहे. चाकणाचा मुद्दाही विरोधकांनी लावून धरला आहे. सत्ताधारी देखील चाकणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देत आहे. दुसरीकडे अभिजीत दीपके यांनीही सरकारी शाळेचा मुद्दा लावून धरला आहे. यासह महाराष्ट्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या.
Published On - Aug 16,2026 8:59 AM
