AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mudhe : तुकाराम मुंढेंच्या लग्नासाठी होत्या तीन अटी, तिसरी अट तर खूपच अवघड

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या आयुष्यातील एक-एक किस्से देखील समोर येत आहेत. असाच लग्नासंबंधिचा एक किस्सा समोर आला आहे.

Tukaram Mudhe : तुकाराम मुंढेंच्या लग्नासाठी होत्या तीन अटी, तिसरी अट तर खूपच अवघड
Tukaram Mundhe Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 7:44 PM
Share

तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून राज्यात कामाचा धडकाच लावला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात छापेमारी सुरू आहे. भेसळखोरांना चांगलाच चाप लागला असून, तुकाराम मुंढे यांच्या कामाचं संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. अधिकारी असावा तर असा असं प्रत्येकजण म्हणताना दिसत आहे. दरम्यान सध्या राज्यभरात त्यांची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या लग्नासंबंधित एक किस्सा आता समोर आला आहे. त्यांचे बंधू अशोक मुंढे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित हा किस्सा सांगितला आहे.  तुकाराम मुंढे यांच्या आपल्या होणाऱ्या पत्नीकडून तीन अपेक्षा होत्या, असं अशोक मुंढे यांनी म्हटलं आहे.

काय होत्या तीन अटी?

या मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे म्हणाले की, लग्नामध्ये आमच्या दोघांचीही क्लियरॅलिटी होते, 100 टक्के सर्व गोष्टी स्पष्ट होत्या. मुलगी कशी असावी? तिचं बॅगग्राऊंड कसं असावं? कशात कॉप्रोमाईज करायचं आणि कुठे कॉप्रोमाईज करायचं नाही. हे तुकाराम मुंढे आणि माझं ठरलेलं होतं.  आता त्याचा एक किस्सा सांगतो, सुरुवातीला तर मीच मुलगी पाहायला जायचो. मला ठीक वाटलं तर मग गोष्ट तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहचायची.

इथे मी त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली, ती दिसायला फार सुंदर होती. आम्ही जेवढ्या मुली पाहिल्या, त्यामध्ये ही दिसायला फार सुंदर होती. मुलीकडचे फार काही श्रीमंत नव्हते पण गरीबपण नव्हते. त्यांचा व्यवसाय होता, मुलगी पुण्यात वाढलेली होती. आता आम्हाला त्या कल्चरला जुळणारी पण मुलगी पाहिजे ना.

आमची पहिली अट होती, तिला इंग्लीश बोलता आलं पाहिजे. तेव्हा मला अनेकजण म्हणायचे की काय आवश्यकता आहे, या गोष्टीची. परंतु तोपर्यंत मी नोकरीत एक बारा तेरा वर्ष काढली होती, त्यामुळे त्याची काय गरज आहे, याची मला कल्पना होती. त्यामुळे तिला इंग्लीश बोलता येते का नाही हे आम्ही पहायचो? दुसरी अट ही होती की मुलीच्या अपेक्षा काय आहेत? आम्ही क्लिअर सांगायचो, जरी तो आयएएस, असला, तरी त्याचा पगार एवढा-एवढा आहे. त्या पगारामध्येच भागावं लागेल. तसेच तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्हाला कार मिळणार नाही, तुम्हाला बसनेच प्रवास करावा लागेल. तेव्हा ते म्हणाले की बाकी सर्व गोष्टी ठीक आहे, पगार कमी आहे, ते पण ठीक आहे. पण बाकीच्या सुविधा तर असतातच ना? तेव्हा माझ्या लक्षात आलं मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तिथून निघून आलो, असा किस्सा अशोक मुंढे यांनी  सांगितला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात