कोरोनाने सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू, दोघेही माजी सरपंच, अख्ख्या गावाने हंबरडा फोडला

कोरोनाने दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना नांदेड तालुक्यातील वडवना गावात घडलीये. सगळ्या पंचक्रोशीत राम लक्ष्मणाची जोडी म्हणून दोघा भावांना ओळखलं जात होतं.

कोरोनाने सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू, दोघेही माजी सरपंच, अख्ख्या गावाने हंबरडा फोडला

नांदेड : कोरोनाने दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना नांदेड जि्ह्यातील वडवना गावात घडलीये. सगळ्या पंचक्रोशीत राम लक्ष्मणाची जोडी म्हणून दोघा भावांना ओळखलं जात होतं. त्यांच्या मृत्यूने वडवना गाव शोकसागरात बुडालंय. (In Nanded Two Brother Death Due to Corona)

दोघा भावांपैकी 78 वर्षीय धाकट्या भावावर नांदेड इथे उपचार सुरु होते, तर 80 वर्षीय थोरल्या भावावर लातुरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी नांदेड इथे उपचार सुरु असणाऱ्या भावाने जीव सोडला तर काही तासातच लातुरच्या भावाने देखील अखेरचा श्वास घेतला.

दोघे भाऊ अतिशय शिस्तप्रिय तसंच कर्तृत्ववान होते. यातील मोठया भावाने 25 वर्ष तर धाकट्याने 10 वर्ष गावाचे सरपंचपद भूषवले होते. गावाच्या विकासासाठी दोघे भाऊ कायम आग्रही होते. गावातील कोणतंही विकासकाम करायचं म्हटलं की दोघाभावांचा विशेष पुढाकार असायचा. विशेष म्हणजे दोघांचे बंधुप्रेम पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.

राम लक्ष्मणा समान असणाऱ्या या जोडीने एकाच दिवशी देहत्याग केल्याने वडवना गावावर शोककळा पसरलीय. ‘कोरोनाने होत्याचं नव्हतं करून टाकलंय. आमच्या घरातील दोन कर्तबगार माणसं अशी अचानक आम्हाला सोडून गेली. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा’, असं म्हणत सगळं गाव राम-लक्ष्मण गेले म्हणून धायमोकलून रडतंय.

दोघा भावांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी थोरल्या भावाला लातुरात तर धाकट्या भावाला नांदेडच्या दवाखान्यात दाखल केलं गेलं होतं. काही दिवस त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी प्राण सोडले.

(In Nanded Two Brother Death Due to Corona)

संबंधित बातम्या

पनवेलमध्ये कोरोनाचा प्रकोप, वाढत्या कोरोना मृत्यूकडे मनपाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

वेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू, नागपूर महापालिकेकडून कोरोना मृत्यूंचे विश्लेषण

Published On - 12:24 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI