AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेत डुकरांचा धुडगूस, डिजीटल शाळा नेमक्या आहेत कुठे?

अमरावती : एकीकडे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजवत आहेत, तर दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत डुकरांचा वावर होत असल्याने शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत मोकाट डुकरं, जनावरे यांचा […]

शाळेत डुकरांचा धुडगूस, डिजीटल शाळा नेमक्या आहेत कुठे?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

अमरावती : एकीकडे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजवत आहेत, तर दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत डुकरांचा वावर होत असल्याने शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत मोकाट डुकरं, जनावरे यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेत लहान विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणी शालेय पोषण आहार बनवला जातो. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचदा डूकरं आढळून आले आहेत. त्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ सारख्या आजाराची लागण विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अनेक वेळा नगर परिषदेला शाळा व्यवस्थापक समितीने पत्रव्यवहार केला. मात्र  शाळेला अजूनपर्यंत संरक्षण भिंत बांधून दिलेली नाही.

आता शाळा व्यवस्थापक समितीने घेतलेल्या ठरावाच्या प्रतिसह शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन डुकरांचा बंदोबस्त करावा किंवा आवार भिंत बांधण्याची मागणी केली आहे. मात्र नगर परिषदेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

उर्दु शाळेतील गंभीर प्रकाराबाबत मी माझ्या सहकारी नगरसेवकांसोबत पाहणी केली असुन, हा प्रकार नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्षांच्या लक्षात आणून दिला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे, कारण लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डूकरांचा बंदोबस्त करून आवात भिंत बांधून द्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव जनआंदोलन उभारावे लागेल असे भाजप गटनेता संजय मोटवानी यांनी म्हटले.

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?