AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजचा तोच तो चहा पिऊन बोअर झालात? आता द्या ट्विस्ट, बनवा शाही राजवाडी चहा

दररोज सकाळ-संध्याकाळ एकच चहा पिऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी चहाला द्या शाही ट्विस्ट. घरच्या घरी काही मसाले आणि केशर वापरून झटपट तयार करता येते स्वादिष्ट राजवाडी चहा. जाणून घ्या रेसिपी

रोजचा तोच तो चहा पिऊन बोअर झालात? आता द्या ट्विस्ट, बनवा शाही राजवाडी चहा
rajwadi chaiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 11:47 AM
Share

दिवसाची सुरूवात असो वा संध्याकाळचा लहान ब्रेक, एक कप गरमा गरम चहा हा असतोच. अनेक लोकांना चहा नाही म्हटलं की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. सकाळची झोप उडवण्यासाठी असो किंवा संध्याकाळचा थकवा दूर करण्यासाठी, चहाचा एक कप मूड फ्रेश करण्यासाठी पुरेसं असतं. पण रोजचा साधा चहा पिऊन कंटाळा आला असेल, तर त्याच चहामध्ये थोडा बदल करून तुम्ही एकदम शाही चव अनुभवू शकता. दूध, चहापत्ती, आले आणि सुगंधी मसाल्यांसोबत केशराचा वापर करून तयार होणारा राजवाडी चहा चवीला वेगळा आणि सुगंधानेही खास असतो. विशेष म्हणजे हा चहा बनवण्यासाठी फार वेळ किंवा खास साहित्याची गरज नाही. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा राजवाडी चहा.

राजवाडी चहा बनवण्याचे साहित्य

राजवाडी चहा बनवण्यासाठी अर्धा इंच आले, अर्धा इंच दालचिनी, ४ वेलची, ५-६ लवंगा आणि अर्धा चमचा बडीशेप लागेल. यासोबत २ कप पाणी, १ चमचा चहापत्ती, १ चमचा साखर, २ कप दूध आणि थोडेसे केशर घ्यावे. मसाल्यांचे हे मिश्रण चहाला नेहमीच्या चहापेक्षा वेगळी चव आणि सुगंध देते.

असा बनवा राजवाडी चहा

सर्वप्रथम आले हलकेच कुटून घ्या. त्यानंतर एका भांड्यात दोन कप पाणी घ्या आणि त्यात आले, दालचिनी, वेलची, लवंग, बडीशेप, चहापत्ती, साखर आणि दूध घाला. हे मिश्रण मंद आचेवर साधारण ३ ते ४ मिनिटे उकळू द्या. त्यामुळे सर्व मसाल्यांचा स्वाद आणि सुगंध चहामध्ये व्यवस्थित मिसळेल. चहा चांगला उकळल्यानंतर शेवटी त्यात थोडेसे केशर घाला आणि साधारण एक मिनिट झाकून ठेवा. त्यानंतर चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा. केशर शेवटी घातल्यामुळे त्याचा सुगंध आणि स्वाद चहामध्ये अधिक चांगला जाणवतो.

नेहमीच्या चहापेक्षा वेगळा कसा?

राजवाडी चहाची खासियत म्हणजे त्यात वापरलेले सुगंधी मसाले आणि केशर. दालचिनी, वेलची, लवंग आणि बडीशेप यांचे मिश्रण चहाला एक वेगळाच स्वाद देते, तर केशर त्याला शाही चव आणि सुगंध देतो. त्यामुळे घरी पाहुणे आले असतील, तर नेहमीच्या चहाऐवजी हा चहा नक्की करून पाहता येतो. पावसाळा असो, थंडी असो किंवा संध्याकाळची निवांत वेळ, गरमागरम राजवाडी चहाचा आनंद घेता येतो. चहा बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी

मसाले प्रमाणापेक्षा जास्त वापरू नका, अन्यथा चहाची चव बिघडू शकते. चहा नेहमी मंद आचेवर उकळल्यास मसाल्यांचा स्वाद व्यवस्थित मिसळतो. केशर शक्यतो शेवटी घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. ताजे मसाले वापरल्यास चहाचा सुगंध आणखी खुलतो. मसालेदार चहाचे सेवनही प्रमाणातच करावे.

Follow Us
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?