रायगडमध्ये रेल्वे गेटसमोर रेल्वे इंजिन तीन तास बंद

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

रायगड : रोहा स्टेशनवरुन पनवेलकडे निघालेल्या मालगाडीचे इंजिन काल रात्री रेल्वे गेटसमोरच बंद पडले. इंजिन बंद पडल्याने तब्बल तीन तास रेल्वे फाटक बंद राहिले होते. यामुळे परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. रेल्वे फाटक बंद झाल्याने रोहा –नागोठणे-अलिबाग आणि रोहा – वाकण रोडवर प्रवास करणाऱ्या तसेच नोकरदार वर्गाचे हाल झाले. 20 जानेवरी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास […]

रायगडमध्ये रेल्वे गेटसमोर रेल्वे इंजिन तीन तास बंद
Follow us on

रायगड : रोहा स्टेशनवरुन पनवेलकडे निघालेल्या मालगाडीचे इंजिन काल रात्री रेल्वे गेटसमोरच बंद पडले. इंजिन बंद पडल्याने तब्बल तीन तास रेल्वे फाटक बंद राहिले होते. यामुळे परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. रेल्वे फाटक बंद झाल्याने रोहा –नागोठणे-अलिबाग आणि रोहा – वाकण रोडवर प्रवास करणाऱ्या तसेच नोकरदार वर्गाचे हाल झाले.

20 जानेवरी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वेच्या रोहा स्टेशनवरुन निघालेली गाडी जेमतेम पनवेल दिशेला अर्धा किमी पुढे आली असता, पडम गावाजवळच्या रेल्वे फाटका समोरच गाडी बंद पडली. यामुळे रोहा – नागोठणे – अलिबाग आणि रोहा ते वाकण (मुबंई गोवा हायवेला जोडणारा) रस्ताच बंद झाल्याने दोन्हीकडे जाणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ आली होती.

सदर मालगाडीच्या इंजिंनमध्ये अचानक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचे रोहा स्टेशन मॅनेजर यांनी सांगितले. दोनच दिवसापूर्वी या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन रोहा-पेण-पनवेल अशी नवीन रेल्वे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या हस्ते हिरवा झेडां दाखवून सुरु करण्यात आली. परंतु या मालगाडीचे बिघाड झालेले इंजिन हे डिझेल इंजिन होते, काही काळानतंर नागोठणे येथून इंजिन मागवून मालगाडीला जोडून ही गाडी पुढे नेण्यात आली.

या झालेल्या प्रकारामुळे स्थानिकांनी तसेच नोकरदार वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी असणारे एकमेव फाटक बंद झाल्याने प्रवाशांची गोची झाली होती.