देशातील पहिली महिला डीजीपी कंचन चौधरी भट्टाचार्य यांचे दीर्घ आजाराने निधन

देशातील पहिला महिली डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (डीजीपी) कंचन चौधरी भट्टाचार्य (Kanchan Chaudhary Bhattacharya) यांचे सोमवारी रात्री (26 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

देशातील पहिली महिला डीजीपी कंचन चौधरी भट्टाचार्य यांचे दीर्घ आजाराने निधन
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 11:23 AM

नवी दिल्ली : देशातील पहिली महिला डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (डीजीपी) कंचन चौधरी भट्टाचार्य (Kanchan Chaudhary Bhattacharya) यांचे सोमवारी रात्री (26 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. कंचन चौधरी (India first woman dgp kanchan chaudhary bhattacharya) या 72 वर्षांच्या होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी म्हणूनही कंचन चौधरी यांची ओळख होती.

कंचन चौधरी या मूळ हिमाचल प्रदेशाच्या रहिवाशी आहेत. त्यांनी 2004 मध्ये उत्तराखंडच्या पोलीस महानिरीक्षक पदी काम केले आहे. त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजेच 31 ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी पोलीस महानिरीक्षक पदावरुन निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर कंचन यांनी राजकीय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून हरिद्वार या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली. पण यात त्यांचा पराभव झाला होता.

कंचन चौधरी यांच्या जीवन संघर्षावर त्यांची बहिण कविता चौधरी यांनी 80 च्या दशकात ‘उडान’ नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. कंचन यांचा देशातील पहिला महिला डीजीपी याचा जीवनप्रवास यात दाखवण्यात आला होता. या शो फार लोकप्रिय ठरला होता.

कंचना चौधरी यांचा अल्पपरिचय

कंचना चौधरी यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. मात्र त्यानंतर त्या दिल्लीतील अमृतसरमध्ये स्थायिक झाल्या. अमृतसरच्या राजकीय महिला महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कंचन यांनी दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमधून इंग्रजी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी 2004 मध्ये मेक्सिकोमध्ये आयोजित इंटरपोलच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

कंचन चौधरी यांचा 1989 मध्ये दीर्घ आणि गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर 1997 मध्ये त्यांना प्रतिष्ठित सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच 2004 मध्ये एक उत्कृष्ट महिला अष्टपैलू म्हणूनही राजीव गांधी अॅवार्डने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.