नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे आक्रित घडले; भारताची ताकदच आता ठरतेय कमकुवत बाजू: राहुल गांधी

| Updated on: Nov 12, 2020 | 11:54 AM

जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 8.6 टक्के इतका राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला होता. | Rahul Gandhi

नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे आक्रित घडले; भारताची ताकदच आता ठरतेय कमकुवत बाजू: राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशाच्या इतिहासात भारताने प्रथमच मंदीच्या फेऱ्यात प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे भारताची ताकदच आता आपली कमकुवत बाजू झालेय, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. (Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)

राहुल गांधी यांनी हे वक्तव्य करताना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीचा दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) 8.6 टक्के इतका राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

रिझर्व्ह बँकेकडून काही दिवसांपूर्वी बुधवारी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये जुलै-डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर 8.6 टक्क्यांपेक्षा खाली राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कोरोना संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत उणे विकासदर नोंदवला गेला होता. त्यामुळे देश मंदीच्या फेऱ्यात अडकल्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.


(Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)

चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे 23.9 टक्क्यांनी खाली आला होता. गेल्यावर्षी 2019-20मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर 5.2 टक्के होता. कोरोनामुळे उत्पादन, गृहनिर्माण, खाण, सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाल्यामुळे ही वेळ ओढावली होती.

दरम्यान, आज मोदी सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना खास गिफ्ट दिले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार 1.5 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. सरकारने बुधवारीच देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आणखी 10 क्षेत्रांना उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) म्हणून 2 लाख कोटी रुपये देण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती.

संबंधित बातम्या:

Nirmala Sitharaman PC : निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद, दिवाळीच्या तोंडावर पॅकेजची घोषणा?

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज : निर्मला सीतारमण

मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; सणांसाठी आगाऊ रक्कम आणि LTC कॅश व्हाऊचर्स

(Rahul Gandhi slams PM Narednra Modi over GDP estimates by RBI)